ETV Bharat / bharat

केवळ एका मताने जिंकली निवडणूक! विजय यांच्या पक्षाचे एस. सेतुपती नेमके कोण?

सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघमचे (DMK) ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के. आर. पेरियाकरुप्पन यांना तिरुपत्तूर विधानसभा मतदारसंघातून केवळ एका मताने पराभव पत्करावा लागला.

Who exactly is S Sethupathi from Vijay party
विजय यांच्या पक्षाचे एस. सेतुपती नेमके कोण? (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2026 at 5:05 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

चेन्नई- तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत एक मोठा आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. यामध्ये द्रविड मुन्नेत्र कळघमचे (DMK) मंत्री के. आर. पेरियाकरुप्पन यांना तिरुपत्तूर मतदारसंघातून केवळ एका मताच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. अभिनेता विजय यांच्या 'तमिझगा वेट्री कळघम' (TVK) या पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराने या अत्यंत निसटत्या फरकाने विजय मिळवला. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतून एक अत्यंत नाट्यमय आणि धक्कादायक निकाल समोर आलाय. सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघमचे (DMK) ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के. आर. पेरियाकरुप्पन यांना तिरुपत्तूर विधानसभा मतदारसंघातून केवळ एका मताने पराभव पत्करावा लागला.

30 फेऱ्यांनंतर निकालाची घोषणा : मतमोजणीच्या सुमारे 30 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर निकालाची घोषणा करण्यात आली. या मतमोजणीदरम्यान श्रीनिवास सेतुपती आर. यांनी केवळ एका मताची आघाडी घेतली आणि नेमक्या याच फरकाने त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. सेतुपती यांना एकूण 83,375 मते मिळाली, तर के. आर. पेरियाकरुप्पन यांना एका मताने पराभव पत्करावा लागला. 2006 मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकल्यापासून तिरुपत्तूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी पहिल्यांदाच पेरियाकरुप्पन यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी मतदान केलंय. या पराभवासह मतदारसंघात गेल्या 20 वर्षांपासून असलेले त्यांचे वर्चस्व संपुष्टात आलंय.

पेरियाकरुप्पन हे राज्य सरकारमध्ये मंत्रिपदाची धुरा सांभाळत होते : खरं तर हा पराभव अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण मानला जातोय; विशेषतः कारण पेरियाकरुप्पन हे राज्य सरकारमध्ये मंत्रिपदाची धुरा सांभाळत होते. त्यांचा हा पराभव केवळ DMK पक्षासाठीच एक धक्का नाही, तर तो राज्यातील राजकारणातील बदलत्या प्रवाहांचेही संकेत देणारा ठरला आहे. या निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या 'TVK' पक्षाने अत्यंत प्रभावी कामगिरी केली. 108 जागा जिंकून ते सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आले आणि याद्वारे त्यांनी पारंपरिक राजकारणासमोर एक प्रबळ आव्हान उभे केलंय.