ETV Bharat / bharat

अमर्त्य सेन यांना एसआयआरमध्ये सुनावणीसाठी नोटीस; अभिषेक बॅनर्जींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून खुलासा

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाकडून एसआरएची प्रक्रिया राबवित असताना नोबेल पुरस्कार विजेत्या अमर्त्य सेन्य यांना नोटीस मिळाल्याचा दावा तृणमुल काँग्रेसनं केला. जाणून घ्या, सविस्तर प्रकरण

Abhishek Claims Amartya Sen Summoned For SIR Hearing
डावीकडून अमर्त्य सेन, उजवीकडे अभिषेक बॅनर्जी (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 7, 2026 at 2:37 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

रामपुरहाट (कोलकाता) - नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांचे नाव एसआयआरमध्ये आल्याचा दावा तृणमुल काँग्रेसचे अखिल भारतीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयोगानं अमर्त्य सेनं एसआयआरच्या सुनावणीसाठी अमर्त्य सेन यांना नोटीस पाठविल्याचं सांगत तृणमुल काँग्रेस नेत्यानं केंद्र सरकारनं टीका केली. दुसरीकडं निवडणूक आयोगानं स्पेलिंगमुळे चूक झाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

तृणमुल काँग्रेसचे अखिल भारतीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी रामपूरहाट येथे मंगळवारी सभा घेतली. त्यानंतर ते म्हणाले, "वीरभूम येथे आल्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांना एसआरएची नोटीस पाठविल्याची माहिती मिळाली. अमर्त्य सेन यांनी देशाचं नाव उज्जवल केलं. त्यांनी जगभरात नावलौकिक मिळविला. त्यांना एसआयआर अंतर्गत नोटीस पाठविण्यात आली आहे. नोबेल पुरस्कार विजेच्या अमर्त्य सेन यांना सुनावणीसाठी का बोलावण्यात येत आहे", असा बॅनर्जी यांनी सवाल उपस्थित केला. "भाजपानं याचं उत्तर द्यावं", अशी त्यांनी मागणीदेखील केली.

मोहम्मद शमीलादेखील मिळाली नोटीस- स्पेशल इंटेसिव्ह रिव्हीजनची (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानंतर अनेक प्रसिद्ध लोकांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामध्ये कवी जॉय गोस्वामी आणि अभिनेता- खासदार देव यांचा समावेश आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या दाव्यानुसार एसआरएच्या नोटीसमध्ये अमर्त्य सेन यांचाही समावेश आहे. एसआयआरच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं, "कितीही एसआरए केले आणि कितीही कारस्थाने रचली तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा आमच्या जागा वाढणार आहेत". अभिषेक बॅनर्जी यांनी क्रिकेटपटू मोहम्मद शमीचा उल्लेख केला. "त्यांनी (निवडणूक आयोगानं) मोहम्मद शमीला सुनावणीसाठी नोटीस पाठविली आहे. ज्यानं जगभरातील क्रिकेटमध्ये योगदान दिलं आहे, वर्ल्ड कपमध्ये सामना खेळून देशाचं जगभरात किर्ती केली आहे, त्याला एसआयआरची नोटीस पाठविली आहे".

डीजीसीएकडून मंजुरी न मिळाल्यानं बॅनर्जींना करावी लागली प्रतिक्षा- अभिषेक बॅनर्जी यांना रामपूरहाटमधील सभेसाठी जाताना हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला डीजीसीएनं मंजुरी दिली नव्हती. त्यावर त्यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. डीजीसीएकडून हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांना बेहाला फ्लाईंग क्लबमध्ये खूप वेळा थांबावं लागलं. त्यानंतर त्यांनी झारखंड सरकारशी संपर्क साधला. हेमंत सोरेन यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून दिली. अखेर बॅनर्जी हे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या चार्टर्ड हेलिकॉप्टरनं रामपूरहाटमधील सभेला हजर राहिले.

निवडणूक आयोगानं काय दिलं स्पष्टीकरण- भारतीय निवडणूक आयोगानं मंगळवारी स्पष्ट केलं की मतदार यादीतील नावाच्या स्पेलिंगमधील चुकीमुळे निवडणूक आयोगानं नोटीस बजाविण्यात आलं होतं. नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना एसआरए सुनावणीसाठी हजर राहण्याची आवश्यकता नाही, असे निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. अर्थशास्त्रज्ञांच्या बाबतीत दुरुस्ती स्थानिक पातळीवर प्रशासकीय स्तरावर केली जाईल, असे एका अधिकाऱ्यानं सांगितलं. अर्थतज्ञ सेन यांच्या कुटुंबातील एका सदस्यानं आयोगाकडून अद्याप कोणतीही सुनावणीची नोटीस मिळालेली नाही, अशी माहिती दिली.

  • नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन हे सध्या विदेशात आहेत. त्यांचं ९२ वर्षे वय आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ८० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना एसआरएच्या नोटीससाठी वैयक्तीक हजर राहण्याची गरज नाही. मात्र, त्यांना नोटीस मिळाल्याचे तृणमुल नेत्यानं आरोप केल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा-