ETV Bharat / bharat

डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या टिफनी ट्रम्प जामनगरच्या दौऱ्यावर; 'वनतारा'ला देणार भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या टिफनी ट्रम्प या त्यांच्या पतीसह जामनगर दौऱ्यावर गेल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि जावाई वनताराला भेट देणार आहेत.

TIFFANY TRUMP VISIT JAMNAGAR
टिफनी ट्रम्प जामनगरच्या दौऱ्यावर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 1, 2026 at 5:40 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

जामनगर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या टिफनी ट्रम्प आणि त्यांचे पती मायकल बोलस सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील अक्षरधाम मंदिर, आग्रा येथील ताजमहाल आणि राजस्थानमधील जैसलमेरला भेट दिल्यानंतर, टिफनी ट्रम्प आता जामनगरमध्ये दाखल झाल्या आहेत. जामनगरमध्ये टिफनी ट्रम्प या वनताराला भेट देणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या टिफनी ट्रम्प आणि त्यांचे पती मायकल बोलस यांच्या आगमनानंतर, जामनगर विमानतळ आणि शहरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

टिफनी ट्रम्प आणि मायकल बोलस यांचं विमानतळावर स्वागत : टिफनी ट्रम्प आणि मायकल बोलस जामनगर विमानतळावर त्यांच्या चार्टर्ड विमानातून खाली उतरले, तेव्हा त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. या आंतरराष्ट्रीय VIP पाहुण्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनानं तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. विमानतळापासून त्यांच्या निवासस्थानापर्यंतच्या संपूर्ण मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

'रिलायन्स ग्रीन्स'च्या दिशेनं प्रस्थान : विमानतळावरील सर्व आवश्यक प्रोटोकॉल आणि औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, टिफनी आणि मायकल बोलस यांचा ताफा चोख पोलीस बंदोबस्तात 'रिलायन्स टाउनशिप'च्या दिशेनं रवाना झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या प्रतिष्ठित संकुलात टिफनी ट्रम्प आणि मायकल बोलस यांच्या विशेष आदरातिथ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जामनगरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनं आयोजित केलेल्या भव्य जागतिक कार्यक्रमांनी यापूर्वीच जगभरातील सेलिब्रिटींना आकर्षित केलं आहे. आता, ट्रम्प कुटुंबातील या सदस्यांची नावंही या प्रतिष्ठित यादीत जोडली गेली आहेत.

जागतिक पातळीवर जामनगरची चर्चा : अलीकडच्या काळात, जामनगर हे केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही व्यवसाय, संस्कृती आणि सेलिब्रिटींच्या हालचालींचं एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलं आहे. ट्रम्प यांची कन्या आणि जावई यांच्या या भेटीमुळे जामनगरच्या जागतिक प्रतिष्ठेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. टिफनी ट्रम्प आणि मायकल बोलस यांच्या या उच्चभ्रू भेटीबाबत स्थानिक नागरिक आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रचंड कुतूहल दिसून आले.

हेही वाचा :

  1. डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी टिफनी ट्रम्प पतीसोबत जैसलमेरमध्ये दाखल, पर्यटन स्थळांना देणार भेट!
  2. गोळीबारानं पुन्हा हादरलं व्हाईट हाऊस : हल्लेखोरानं झाडल्या तब्बल 'इतक्या' गोळ्या, सुरक्षा रक्षकांनी दिलं चोख प्रत्युत्तर
  3. इराणच्या उत्तरावर डोनाल्ड ट्रम्प नाराज, शांतता चर्चा फिस्कटली; दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला