खमेनींच्या हत्येबाबत मौन बाळगल्यानं सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका, संसदेत चर्चेची केली मागणी
सोनिया गांधी यांनी इराण मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. केला. "मोदी सरकारचं ही मौन तटस्थता नसून कर्तव्यात कसूर आहे", असे त्यांनी एका लेखात म्हटलं.

Published : March 3, 2026 at 2:38 PM IST
नवी दिल्ली: इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यावरून काँग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. सोनिया गांधींनी मोदी सरकारला परराष्ट्र धोरणाची आठवण करून दिली.
अमेरिका आणि इस्रायलनं हवाई हल्ले करून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांची हत्या केली. उल्लेखनीय बाब म्हणजे चालू वाटाघाटी दरम्यान एका विद्यमान राष्ट्रप्रमुखाची हत्या झाल्यानंतर जागतिक राजकारणात तीव्र पडसाद उमटले आहेत. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी एका माध्यमात लेख लिहून मोदी सरकारवर टीका केली.
"इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येबाबत सरकारचं मौन तटस्थता नाही. तर कर्तव्यात कुचराई आहे. यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत आणि विश्वासार्हतेवर गंभीर शंका उपस्थित होत आहेत", असे सोनिया गांधींनी म्हटलं आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय परिस्थिती बिघडली असताना सरकारच्या त्रासदायक मौनावर कोणताही विलंब न करता स्पष्ट आणि खुली चर्चा व्हावी, अशी सोनिया गांधींनी अपेक्षा व्यक्त केली.
एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखात सोनिया गांधींनी म्हटलं की," आपल्याला तातडीनं नैतिक सामर्थ्य पुन्हा शोधण्याची आणि ती स्पष्टपणे आणि वचनबद्धतेनं सांगण्याची गरज आहे. सरकारचं मौन तितकंच धक्कादायक आहे. खामेनींची हत्या आणि इराणी सार्वभौमत्वावर हल्ला झाला. मात्र, पंतप्रधान मोदींनी युएईवर इराणच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्याचा निषेध करण्यापुरते स्वत:ला मर्यादित ठेवलं".
आपल्या देशाकडून सार्वभौमत्वाचं किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याचं खुलेपणानं संरक्षण करण्यात आलं नाही. मात्र, एखाद्या विदेशातील नेत्याची हत्या केल्यानंतर निष्पक्षपणा सोडला जातो, तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाबाबत आणि विश्वासार्हतेबद्दल गंभीर शंका निर्माण होते- काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, सोनिया गांधी
त्यांनी दावा केला की, "या घटनेचे परिणाम भू-राजकारणाच्या पलीकडे होणार आहेत. या दुःखद घटनेचा परिणाम संपूर्ण खंडांवर जाणवत आहे. भारताची भूमिका या दुर्घटनेला त्याचा मूक पाठिंबा दर्शवते. काँग्रेस पक्षानं इराणच्या भूमीवर झालेल्या बॉम्बस्फोट आणि हत्यांचा स्पष्टपणे निषेध केला आहे. त्यामधून गंभीर प्रादेशिक निर्माण होऊन जगभरात धोकादायक परिणाम होणार आहेत", असा त्यांनी इशारा दिला.
भारताच्या परराष्ट्र धोरणाची करून दिली आठवण- पुढे काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षांनी म्हटलं, "आम्ही जगभरातील इराणी लोक आणि शिया समुदायांबद्दल आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारतीय संविधानाच्या कलम ५१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे भारताचे परराष्ट्र धोरण हे वादांवर शांततापूर्ण मार्ग काढण्यावर आधारित आहे. सार्वभौम समानता, हस्तक्षेप न करणे आणि शांततेला प्रोत्साहन देणे, ही तत्त्वे ऐतिहासिकदृष्ट्या भारताच्या राजनैतिक ओळखीचा मुख्य घटक आहेत".
हेही वाचा-

