"राहुल-सोनिया गांधींच्या डोळ्यात अश्रू आले; न्यायासाठी आश्वासन दिलं"-भेटीनंतर उन्नाव पीडितेची माहिती
उन्नाव बलात्कार पीडितेनं आज दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीनंतर पीडितेनं सर्वोच्च न्यायालया जाऊन कुलदीप सेंगलच्या जामिनाविरोधात आव्हान देणार असल्याचं सांगितलं.

Published : December 24, 2025 at 8:32 PM IST
नवी दिल्ली: २०१७ च्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित आणि महिला कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी १० जनपथ (कर्तव्यपथ) येथे जाऊन गांधी कुटुंबाची भेट घेतली. भेटीदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी रडत होत्या, अशी माहिती पीडितेनं दिली.
गांधी कुटुंबीयांच्या भेटीपूर्वी उन्नाव बलात्कार पीडितेनं माध्यांना सांगितलं होतं की, "आम्हाला फक्त त्यांना भेटून आमच्यावर काय परिस्थिती ओढवली आहे, हे सांगायचं आहे. मला पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि राष्ट्रपतींनाही भेटायचं आहे. मला न्याय हवा आहे."
२०१७ च्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेनं म्हटलं "बलात्कार प्रकरणात शिक्षेला स्थगिती देऊन जामीन मंजूर करण्यात आला. हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच आदेश आहे. देशातील सर्व मुलींना त्यांच्यावर बलात्कार होण्याची भीती आहे. गुन्हेगार सहज सुटतील. त्याला (कुलदीप सेंगल) आमच्यापासून ५ किमी दूर राहण्याचा आदेश देऊन त्यांनी आम्हाला आमच्या घरातच कोंडून ठेवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल, असा विश्वास आहे".
राहुल गांधी आणि सोनिया गांधी रडत होते- सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेनं माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. पीडितेनं म्हटलं की "त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं. देशात पहिल्यांदाच बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामिनावर सोडले जात आहे. मला पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ हवा आहे. राहुल गांधींनी आम्हाला खूप सामर्थ्य दिलं आहे. आम्हाला न्याय मिळेल", असे आश्वासन दिलं आहे. पीडितेनं पुढं म्हटलं की, "त्या दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिले. माझे बोलणं ऐकून राहुल गांधी आणि सोनिया गांधी रडत होते".
पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला अजूनही धोका- दिल्ली उच्च न्यायालयानं उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सिंह सेंगरला सशर्त जामीन दिल्यानंतर आज वकील मेहमूद प्राचा यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, "पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला अजूनही धोका आहे. शिक्षेला स्थगिती देऊन जामीन देणं हा कायद्याचा संपूर्ण विपर्यास आहे. हा कसला तर्क आहे? आरोपी दयेला पात्र का आहे? आरोपीनं तिच्या वडिलांना पोलीस एसएचओकडून मारून टाकलं. त्यामुळे आरोपी हा पाच किलोमीटरच्या परिघात असण्यानं किंवा नसण्यानं काही फरक पडत नाही. उत्तर प्रदेश सरकार, केंद्र सरकार न्यायालयात आणि न्यायालयाबाहेरही पूर्ण ताकदीने आमचा विरोध करत आहे. सुरक्षा मागे घेण्यासाठी त्यांनी मोठे वकील नेमले आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला योग्य तयारीसाठी वेळ हवा आहे. आम्हाला या लढ्यात अपुऱ्या तयारीनं उतरणार नाही. पण जर जनतेनं आवाज उठवला, तरन्याय मिळेल, अशी आहे. मात्र, मला सर्वोच्च न्यायालयाकडून फार कमी आशा आहे."
दरम्यान, सामूहिक सामूहिक बलात्कार पीडिता आणि तिची आईनं आंदोलन केलं असताना पोलिसांनी त्यांच्यावर मंगळवारी रात्री कारवाई केली. त्यावर राहुल गांधी यांनी एक्स मीडियात पोस्ट करून संताप व्यक्त केला. न्यायासाठी आवाज उठवण्याचं धाडस केलं, हा तिचा दोष आहे का? असे राहुल गांधींनी एक्स मीडियात पोस्ट केली. गुन्हेगाराला (माजी भाजप आमदार) जामीन मिळाला, हे अत्यंत निराशाजनक आणि लज्जास्पद आहे. पीडितेला वारंवार त्रास दिला जात आहे. भीतीनं जगत आहे. लोकशाहीमध्ये आणि मतभेदांचा आवाज उठवणे हा अधिकार आहे. तो दाबणं हा गुन्हा आहे. पीडितेला आदर, सुरक्षा आणि न्याय मिळायला हवा", अशी त्यानं अपेक्षा व्यक्त केली.
हेही वाचा-

