ETV Bharat / bharat

उन्नाव बलात्कार प्रकरणात माजी आमदाराला दिलासा, दिल्ली हायकोर्टाकडून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती

दिल्ली हायकोर्टानं माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

Ex MLA Kuldeep Sengar
माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर (File Photo - ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 23, 2025 at 7:56 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : 2017 च्या उन्नाव बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरला दिल्ली हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. कोर्टानं सेंगर याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. तसंच सेंगरनं पीडितेच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या 5 किलोमीटरच्या परिसरात जाऊ नये, असे निर्देश कोर्टानं दिले आहेत. याशिवाय, कोर्टानं 15 लाख रुपयांचा जातमुचलका भरण्याचे निर्देशही दिले आहेत.

सशर्त जामीन मंजूर : न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी होईपर्यंत शिक्षा स्थगित करण्याचे आदेश दिले. तसंच हायकोर्टानं कुलदीप सिंह सेंगरला जामिनावर असताना दिल्लीतच राहण्याचे आणि पीडितेच्या घरापासून पाच किलोमीटरच्या हद्दीत न जाण्याचे आदेश दिले. दरम्यान, कुलदीप सिंह सेंगरनं ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं आहे, जे अद्याप प्रलंबित आहे.

ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान : 16 डिसेंबर 2019 रोजी, तीस हजारी कोर्टानं कुलदीप सिंग सेंगरला बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या कोठडीतील हत्येप्रकरणी दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तीस हजारी कोर्टानं सेंगरला दहा लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. तसंच याप्रकरणी तीस हजारी कोर्टानं सेंगरसह सर्व सातही आरोपींना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची आणि प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.

बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येचा आरोप : बलात्कार पीडितेच्या वडिलांचा 9 एप्रिल 2018 रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. 4 जून 2017 रोजी बलात्कार पीडितेनं कुलदीप सेंगरवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्याचा भाऊ अतुल सिंह आणि त्याच्या साथीदारांनी पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण केली आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर काही तासांतच मुलीच्या वडिलांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

कुलदीप सिंग सेंगरला सुनावली होती दहा वर्षांची शिक्षा : पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी तीस हजारी कोर्टानं 20 डिसेंबर 2019 रोजी कुलदीप सेंगरला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसंच जन्मठेपेच्या शिक्षेव्यतिरिक्त कोर्टानं त्याला 25 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. सेंगरनं या मिळालेल्या शिक्षेविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. याच याचिकेवर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत सेंगरला मिळालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

हेही वाचा :

  1. अखेर औरंगाबाद विमानतळाचे नाव होणार छत्रपती संभाजीनगर विमानतळ, निवडणुकीत श्रेयवादाची लढाई रंगणार
  2. विजय मल्ल्यानं भारतात परत यावं, दुसऱ्या दिवसापासून आम्ही याचिकेवर सुनावणी सुरू करू - हायकोर्ट
  3. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावर चोरीच्या घटनांना मोठा आळा; महिला चोराचं जाळं उद्ध्वस्त