ETV Bharat / bharat

तिहेरी हत्याकांडानं हादरली दिल्ली ; मुलगाच झाला हैवान : आई, भाऊ अन् बहिणीची केली निर्घृण हत्या

राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं चांगलीच हादरली आहे. दिल्लीतील लक्ष्मीनगर परिसरात मुलानं आपल्या आई, भाऊ अन् बहिणीची निर्घृण हत्या केली.

TRIPLE MURDER IN DELHI
प्रतिकात्मक छायाचित्र (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 5, 2026 at 8:00 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : मुलानं रागाच्या भरात आई, भाऊ अन् बहिणीची हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरात घडली आहे. आई, भाऊ आणि बहिणीची निर्घृण हत्या केल्यानंतर मारेकऱ्यानं थेट पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मुलानच आई, भाऊ अन् बहिणीची हत्या केल्यानं परिसरात मोठी दहशत पसरली. मात्र त्यानं ही हत्या का केली, याबाबतची माहिती अद्यापही स्पष्ट झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुलानं केला आई, भाऊ अन् बहिणीची निर्घृण हत्या : मुलानं आई, भाऊ अन् बहिणीची निर्घृण हत्या केल्यानंतर मारेकरी थेट पोलीस ठाण्यात गेला. त्यानं पोलीस ठाण्यात त्यानं घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे लक्ष्मीनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचं पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानंतर खोलीतील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. हा तरुण इतका भयानक पाऊल कसा उचलू शकतो, हे पाहून शेजाऱ्यांना धक्का बसला. घरगुती वादातून मुलानं हे हत्याकांड घडवून आणल्याचा प्राथमिक तपास पोलिसांनी व्यक्त केला. मात्र तरीही हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. आरोपीची मानसिक स्थिती, कौटुंबिक वाद आणि इतर घटकांचा विचार करून पोलीस सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. लक्ष्मीनगर पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.

लवकरच संपूर्ण प्रकरणाचा होईल उलगडा : घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या हत्याकांडाची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासणीतून ही हत्या करण्यामागचं कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. लवकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईलस, असा दावा पोलिसांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. या हत्याकांडामुळे शेजारी आणि स्थानिक नागरिक हादरले आहेत.

हेही वाचा :

  1. बहिणींनी ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला शिकवला चांगलाच धडा, डोळ्यात मिरची पूड टाकून ठार मारलं
  2. नांदेड मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; मुलांनीच केला आई-वडिलांचा खून, नंतर स्वत: केली आत्महत्या
  3. कोल्हापूर : घरवाटणीच्या वादातून मुलानं स्वत:च्या आई-वडिलांना संपवलं; खून करून आरोपी पोलीस ठाण्यात हजर