ETV Bharat / bharat

अरविंद केजरीवाल यांची निर्दोष सुटका केल्यानंतर पत्नी सुनीता केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, मानले देवाचे आभार

राऊस अव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता केली.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 27, 2026 at 12:37 PM IST

|

Updated : February 27, 2026 at 1:28 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्यात सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केलीय. विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी त्यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिलेत.

सत्याचा विजय झाला - अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या, "मी आज देवाचे आभार मानू इच्छिते. अरविंदजींनी त्यांचे आयुष्य प्रामाणिकपणे घालवले आहे. पण, या लोकांनी (भाजपा) अरविंदजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात पाठवलं. मला विश्वास होता की, सत्याचा विजय होईल. आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते."

अरविंद केजरीवाल यांना रडू कोसळलं - दरम्यान, दारू धोरण प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अरविंद केजरीवाल भावुक झाले होते. त्यांनी सांगितलं की त्यांच्याविरुद्धचा संपूर्ण खटला बनावट आहे. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी याला सत्याचा विजय म्हटलं आणि सांगितले की त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे.

सुनीता केजरीवाल यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केलं की, या जगात कोणी कितीही शक्तिशाली झालं तरी ते शिवाच्या शक्तीला मागे टाकू शकत नाहीत. सत्याचा नेहमीच विजय होतो.

कट रचण्यात आला - संजय सिंह म्हणाले, "न्यायालयानं आमच्या नेत्यांना निर्दोष सोडलं. यावरून हे सिद्ध होतं की या देशात धोकादायक कट रचणारे सत्तेत आहेत. त्यांनी देशातील सर्वात लोकप्रिय आणि प्रामाणिक तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सर्वात सक्षम आणि प्रामाणिक तत्कालीन शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पक्षाला बदनाम करण्याचा कट रचला."

खटला राजकीयदृष्ट्या प्रेरित - न्यायालयाच्या निर्णयामुळं दिल्लीचे राजकारण ढवळून निघणार हे निश्चित आहे. आम आदमी पक्षानं याला "सत्याचा विजय" म्हटलं आहे. पक्षाचं म्हणणं आहे की, संपूर्ण खटला राजकीयदृष्ट्या प्रेरित होता आणि आजच्या न्यायालयाच्या निर्णयानं ते सिद्ध झालं आहे. त्याचवेळी, कायदेशीर तज्ञांचा असा विश्वास आहे की, हा निर्णय सीबीआयसाठी मोठा धक्का आहे.

हेही वाचा - दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांची निर्दोष मुक्तता; निकालानंतर केजरीवालांना रडू कोसळलं

Last Updated : February 27, 2026 at 1:28 PM IST