सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल
सोनिया गांधी यांना यापूर्वीही नियमित तपासणीसाठी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Published : January 6, 2026 at 3:48 PM IST
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली असल्यामुळं त्यांना उपचारासाठी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी रात्री 10 वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रुग्णालयाचे चेअरमन डॉ. अजय स्वरूप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसंच थंड हवामान आणि प्रदूषणाच्या एकत्रित परिणामांमुळं त्यांचा ब्रोन्कियल अस्थमा थोडा वाढल्याचं वैद्यकीय तपासणीत दिसून आलं.
सध्या प्रकृती स्थिर : डॉ. अजय स्वरूप यांनी पुढं सांगितलं की, खबरदारीचा उपाय म्हणून सोनिया गांधी यांना पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना अँटीबायोटिक्स आणि इतर सहाय्यक औषधं दिली जात आहेत. तसंच त्यांची प्रकृती सुधारत आहे. याशिवाय, सोनिया गांधी यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर त्यांच्या तब्येतीत होणारी सुधारणा पाहून घेतील.
STORY | Sonia Gandhi admitted to Delhi's Ganga Ram hospital, say sources
— Press Trust of India (@PTI_News) January 6, 2026
Congress leader Sonia Gandhi has been admitted to the Sir Ganga Ram Hospital in Delhi, sources said on Tuesday. She is doing fine and has been kept under observation of a chest physician, they said.
READ:… pic.twitter.com/5S3iT3UCgj
यापूर्वीही नियमित तपासणीसाठी रुग्णालयात : गेल्या काही काळापासून सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत चढ-उतार दिसून येत आहेत. 7 जून 2025 रोजी हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यादरम्यान सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांना शिमला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याशिवाय, फेब्रुवारी 2025 मध्येही त्यांना पोटाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सोनिया गांधी यांना यापूर्वीही नियमित तपासणीसाठी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
2017 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा : सोनिया गांधी यांनी दीर्घकाळ काँग्रेसचे अध्यक्षपद भुषवलं आहे. तसंच सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच काँग्रेसनं 2004 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी 2017 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत.
हेही वाचा :

