ऐतिहासिक 'भूतानाळ' तलावात आढळले सहा मृतदेह: पोलिसांनी व्यक्त केला संशय
ऐतिहासिक 'भूतानाळ' तलावात बुधवारी सहा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. 'भूतानाळ' तलावाच्या काठावर दोन मुलं आणि चार महिलांचे मृतदेह तरंगताना आढळले.


Published : August 26, 2026 at 10:51 AM IST
बंगळुरू : विजापूर शहराच्या बाहेरील भागात असलेल्या ऐतिहासिक 'भूतानाळ' तलावात बुधवारी सहा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. 'भूतानाळ' तलावाच्या काठावर दोन मुलं आणि चार महिलांचे मृतदेह तरंगताना आढळले. या घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. तलाव पाहत असताना पाय घसरल्यामुळे ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तलावात आढळले सहा मृतदेह : तलावात सहा जणांचे मृतदेह आढळून आल्यानं शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. पोलीस उपाधीक्षक नागराज, आदर्श नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सीताराम लमानी आणि पोलीस जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. तलावातून मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान मृत व्यक्तींची नावं आणि पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. तलावाच्या काठावर आढळलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत. तपास आणि शवविच्छेदनानंतरच या घटनेबाबतची नेमकी माहिती स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
( सविस्तर बातमी थोड्याच वेळात )

