एअर अॅम्ब्युलन्स विमान कोसळलं, सात जणांचा मृत्यू; रुग्णाला घेवून दिल्लीला निघालं होतं विमान
झारखंडच्या छत्रा जिल्ह्यातील सिमरियाजवळ एअर अॅम्ब्युलन्स विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली.

Published : February 24, 2026 at 6:50 AM IST
|Updated : February 24, 2026 at 7:45 AM IST
छत्रा - झारखंडच्या छत्रा जिल्ह्यातील सिमरियाजवळ एअर अॅम्ब्युलन्स विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. सोमवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. यातील सर्व सात जणांचा मृत्यू झाला. रांचीहून दिल्लीला जाताना हा अपघात झाला, असं राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
"या अपघातात एअर अॅम्ब्युलन्समधील सर्व सात जणांचा मृत्यू झाला. विमान रांचीहून दिल्लीला जात होते," असे छत्राच्या उपायुक्त कीर्तीश्री जी यांनी सांगितलं.
#WATCH | An air ambulance, with seven people (including 2 crew members) on board, crashed in Kasariya Panchayat, Simariya block of Chatra district, in Jharkhand.
— ANI (@ANI) February 24, 2026
It was a Redbird Airways Pvt Ltd Beechcraft C90 aircraft VT-AJV operating a medical evacuation (air ambulance)… pic.twitter.com/xmr9OOcdNh
एअर अॅम्ब्युलन्स विमान जंगलात कोसळलं - 'रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड'द्वारे चालवल्या जाणाऱया या एअर अॅम्ब्युलन्स विमानानं रांची विमानतळावरून सोमवारी संध्याकाळी ७:११ वाजता उड्डाण केलं. छत्रा उपायुक्त कीर्तिश्री जी यांच्या मते, विमान संध्याकाळी ७:३० च्या सुमारास बेपत्ता झाले आणि नंतर दाट जंगल असलेल्या सिमरियाच्या बरियातु पंचायत भागात ते कोसळलं.
मृतांची नावं - एसडीपीओ शुभम खंडेलवाल यांनी 'पीटीआय'ला पुष्टी दिली की, सर्व सातही मृतदेह सापडले आहेत. मृतांची ओळख पटली आहे. कॅप्टन विवेक विकास भगत, कॅप्टन सवराजदीप सिंग, संजय कुमार, डॉ.विकासकुमार गुप्ता, सचिन कुमार मिश्रा, अर्चना देवी, धुरु कुमार अशी मृतांची नावं आहेत.
#WATCH | Chatra, Jharkhand | On air ambulance crash in Simariya block, SP Sumit Kumar Agarwal says, " we got information around 10 that an accident has happened... getting here was difficult considering the terrain... the delhi team will come here for investigation and try to… https://t.co/YOYVIHUfhf pic.twitter.com/SE5bvZCVIp
— ANI (@ANI) February 24, 2026
चौकशीसाठी दिल्लीची टीम येणार - एसपी सुमित कुमार अग्रवाल म्हणाले, "आम्हाला १० वाजताच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळाली. तो परिसर पाहता तिथं पोहोचणं कठीण होतं. दिल्लीची टीम घटनेच्या चौकशीसाठी येथे येईल. ब्लॅक बॉक्स शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेत एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे."
अपघाताबद्दल डीसी कीर्तीश्री जी यांनी सांगितलं, "विमान हे वादळामुळं कोसळलं असावं. मृतांची एकूण संख्या सात असून, दोघे क्रू मेंबर होते आणि उर्वरित पाच जण एक रुग्ण आणि रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य होते."
हेही वाचा -

