ETV Bharat / bharat

माओवादी चळवळीला जबर हादरा, एक कोटी रुपयांचं बक्षीस असणाऱ्या कमांडर देवजीचं आत्मसमर्पण

तेलंगणातील आसिफाबाद जिल्ह्यातील जंगलात बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) शी संबंधित शीर्ष माओवादी नेत्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.

Maoist commander Devji surrenders
माओवादी कमांडर देवजीचं आत्मसमर्पण (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 22, 2026 at 7:51 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद: देशातील माओवाद आणि नक्षलवाद आता अखेरच्या टप्प्यात पोहोचल्याचं चित्र दिसत आहे. मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याच्या दिशेनं मोठं यश मिळाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, तेलंगणातील वरिष्ठ माओवादी नेता थिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी आणि मल्ला राजी रेड्डी उर्फ संग्राम यांच्यासह सुमारे 20 माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेशी संबंधित या नक्षलवाद्यांनी तेलंगणातील आसिफाबाद येथील जंगल परिसरात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. मात्र, यासंदर्भात पोलिसांकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही.

देवजीची प्रमुख नेत्यांमध्ये गणना : देवजी याची गणना प्रमुख माओवादी नेत्यांमध्ये होते. तो सध्या माओवादी पक्षाच्या सेंट्रल कमिटीचा सचिव असल्याचं सांगितले जातं. नंबाला केशव राव याच्या एन्काउंटरनंतर त्यानं पक्षाची धुरा सांभाळली होती. देवजी हा तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या घडामोडीमुळे बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेच्या अस्तित्वावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पक्षाचे सचिव थिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी (60) आणि सेंट्रल कमिटी-कम-पोलीट ब्युरो सदस्य मल्ला राजी रेड्डी उर्फ संग्राम (76) यांनी इतर 16 कार्यकर्त्यांसह आत्मसमर्पण केलं.

मीडिया रिपोर्टनुसार, तेलंगणा पोलिसांच्या स्पेशल इंटेलिजन्स ब्युरो (SIB) समोर रविवारी (22 फेब्रुवारी) सकाळी हे आत्मसमर्पण करण्यात आलं. आत्मसमर्पण पत्करलेल्या कार्यकर्त्यांमध्ये काही उच्चपदस्थ माओवादी नेत्यांचाही समावेश असल्याचे सांगितलं जातं.

588 माओवादी सामान्य मुख्य प्रवाहात परतले : तेलंगणा पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांनी अलिकडेच माओवाद्यांना मुख्य प्रवाहात परतण्याचं आवाहन केलं होतं. राज्य सरकारच्या 'आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजने' अंतर्गत त्यांना मदत दिली जाईल. गेल्या दोन वर्षांत, तेलंगणा पोलिसांच्या प्रयत्नांमुळे, 588 माओवादी मुख्य प्रवाहात परतले आहेत.

हेही वाचा