ETV Bharat / bharat

सिंधिया राजघराण्यातील विष्णू मंदिरात चोरी; मौल्यवान वस्तू, मूर्ती केल्या गायब

ग्वाल्हेरमधील सिंधिया राजवंशाच्या छत्री परिसरातील विष्णू मंदिरातून मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 23, 2026 at 8:34 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

ग्वाल्हेर Theft at Vishnu temple in Gwalior : ग्वाल्हेरमधील सिंधिया राजवंशाच्या छत्री परिसरातील विष्णू मंदिरातून मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. चोरीच्या बातमीनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सिंधिया हे राजघराणं असून, विष्णू मंदिरावर त्यांची अपार श्रद्धा आहे. याच मंदिरात चोरी झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मंदिरातील सुरक्षारक्षकाकडून पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलीस तपास सुरू आहे.

विष्णू मंदिरातून मौल्यवान वस्तू चोरीला - सिंधिया राजवंशातील अम्मा महाराज छत्री संकुल हे ग्वाल्हेरमधील कटोरा ताल येथे असलेल्या सिंधिया महल जय विलास पॅलेसजवळ आहे. या ठिकाणी सिंधिया राजघराण्यातील सदस्यांची समाधी देखील आहे. भगवान विष्णूला समर्पित एक शाही मंदिर देखील या संकुलात आहे. रविवारी पुजारी आले आणि मंदिराचे दरवाजे उघडले तेव्हा त्यांना आढळले की १८ मौल्यवान चांदी, पितळ आणि तांब्याच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि अर्पण भांड्यांसह गायब आहेत.

गुन्हा दाखल करत तपास सुरू - या घटनेनंतर, छत्री संकुलामधील चौकीदारानं पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाची माहिती देताना सीएसपी मनीष यादव म्हणाले, "अम्मा महाराजांच्या छत्री येथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकानं सांगितलं की, शनिवार आणि रविवारी रात्री दोन गार्ड ड्युटीवर होते, एक आवारात आणि एक मुख्य गेटवर तैनात होता. पण छत्री संकुलात कोणीही दिसलं नाही. सकाळी पुजाऱ्याने मंदिरात चोरी झाल्याची तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे, अज्ञात चोराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे."

हेही वाचा - मोटारसायकल चोरी करणारी टोळी देहूरोड पोलिसांकडून जेरबंद; एकूण 6 गुन्हे उघडकीस