ETV Bharat / bharat

धक्कादायक! विद्यार्थिनीच्या प्रायव्हेट पार्टवर लिव्ह-इन पार्टनरने सॅनिटायझर ओतले आणि आग लावली

पोलिसांनी सांगितलं की, 19 फेब्रुवारी 2026 च्या रात्री एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

Sanitiser Poured On Private Parts, Set On Fire: Tripura Student Alleges Brutal Assault By Live-In Partner In Gurugram
धक्कादायक! विद्यार्थिनीच्या प्रायव्हेट पार्टवर लिव्ह-इन पार्टनरने सॅनिटायझर ओतले आणि आग लावली (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 22, 2026 at 1:52 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

गुरुग्राम : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. एका 19 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्या मित्रानं अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विद्यार्थिनी आपल्या मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. शिवम असं तिच्या लिव्ह-इन पार्टनरचे नाव आहे. शिवमनं विद्यार्थिनीच्या गुप्तांगांवर सॅनिटायझर ओतले आणि आग लावली. तसंच या घटनेचा शिवमनं व्हिडिओ बनवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ही घटना बादशाहपूर पोलीस स्टेशन परिसरात घडली. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, 19 फेब्रुवारी 2026 च्या रात्री एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

एका ऑनलाइन अॅपद्वारे दोघांची ओळख : पीडित विद्यार्थिनी मूळची त्रिपुरामधील आहे. गुरुग्राममधील सेक्टर 69 मध्ये पीजीमध्ये राहून बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीएससीचे शिक्षण घेत होती. यादरम्यान, तिची भेट दिल्लीतील नरेला येथील रहिवासी शिवम याच्यासोबत एका ऑनलाइन अॅपद्वारे झाली. सप्टेंबर 2025 मध्ये त्यांनी एकमेकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटू लागले. दरम्यान, शिवमनं लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, असा पीडितेचा आरोप आहे. तसंच काही काळानंतर ते गुरुग्राममध्ये एकत्र राहू लागले. या काळात आरोपीला तिच्यावर संशय आला आणि त्याने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली.

मारहाणीचा आरोप : पीडितेनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, 16 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपीने तिला गंभीर मारहाण केली. शिवमनं स्टीलच्या बाटलीनं तिच्या डोक्यावर मारहाण केली. तसंच तिचे डोके भिंतीवर आणि फर्निचरवर आपटले. त्यानंतर तिला मातीच्या भांड्याने मारहाण केली, असा आरोप मुलीनं केला आहे. याचबरोबर, आरोपी शिवमनं तिच्या गुप्तांगांवर सॅनिटायझर ओतले आणि आग लावण्याचा प्रयत्न केला. तसंच पायांवर चाकूने वार केल्याचा आरोपही पीडित विद्यार्थिनीनं केला आहे.

व्हिडिओ बनवल्याचाही आरोप : पीडितेनं सांगितलं की, आरोपीनं तिचे नग्न व्हिडिओ बनवले. तसंच 18 फेब्रुवारीच्या मुलीनं आरोपीच्या फोनद्वारे तिच्या आईला संपूर्ण घटना बंगाली भाषेत सांगितली. त्यावेळी आरोपीला बंगाली येत नव्हती, म्हणून त्याला तिच्यावर संशय आला नाही. यानंतर मुलीच्या आईनं ताबडतोब 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केलं.

सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू : पोलिसांनी प्रथम विद्यार्थिनीला गुरुग्रामच्या सेक्टर 10 येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्यामुळं तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारानंतर पोलिसांनी तिचा सविस्तर जबाब नोंदवला. दरम्यान, गुरुग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी संदीप कुमार म्हणाले, "आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारावर कठोर कारवाई केली जाईल."

आरोपीची तुरुंगात रवानगी : गुरुग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी संदीप कुमार म्हणाले, "या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबानं गुरुग्राम पोलिसांना कळवलं की, मुलीला तिच्या एका मित्राकडून मारहाण होत होती. पोलिसांनी मुलीची सुटका केली आणि तिला रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे. तातडीनं कारवाई करत आरोपी शिवम नावाच्या 19 वर्षीय मुलाला तात्काळ अटक करण्यात आली. लेखी तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी अत्याचार आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून पोलीस कोठडीत घेण्यात आले. पोलीस रिमांडनंतर, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगात पाठवण्यात आले. तो सध्या तुरुंगात आहे. पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत आहेत."

हेही वाचा :

  1. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा धक्का, बाल लैंगिक शोषण प्रकरणात गुन्हा दाखल होणार
  2. भाजपा आमदार लाचखोरी प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात; कंत्राटदाराकडून ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं
  3. उत्तर प्रदेशात बाल पोर्नोग्राफी प्रकरण; दोषी जेई आणि त्याच्या पत्नीला मृत्युदंडाची शिक्षा, सीबीआय पथकही उपस्थित