ETV Bharat / bharat

SATTE 2026 मध्ये रामोजी फिल्म सिटीनं वेधलं लक्ष; 23 एप्रिलपासून 46 दिवसांचा मेगा कार्निव्हल

23 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या 46 दिवसांच्या कार्निव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी फिल्म सिटी व्यवस्थापनानं पर्यटक, कार्यक्रम नियोजक आणि चित्रपट प्रेमींना आमंत्रित केलं आहे.

Ramoji Film City Steals The Spotlight At SATTE 2026, Welcomes Guests To Mega 46-Day Carnival
SATTE 2026 मध्ये रामोजी फिल्म सिटीनं वेधलं लक्ष (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 26, 2026 at 2:44 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या रामोजी फिल्म सिटीनं (Ramoji Film City) दिल्लीतील यशोभूमी इथं बुधवारपासून आयोजित करण्यात आलेला तीन दिवसांचा साउथ एशिया ट्रॅव्हल अँड टुरिझम एक्सचेंज (SATTE) 2026 कार्यक्रम चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात फिल्म सिटीच्या प्रभावी पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि अनोखे स्टुडिओ अनुभव दाखवले जातील. दरम्यान, फिल्म सिटीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, रामोजी फिल्म सिटी पर्यटन, चित्रपट निर्मिती आणि कार्यक्रमांसाठी एक आघाडीचे ठिकाण म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहेत.

23 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या 46 दिवसांच्या कार्निव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी फिल्म सिटी व्यवस्थापनानं पर्यटक, कार्यक्रम नियोजक आणि चित्रपट प्रेमींना आमंत्रित केलं आहे. चीफ बिझनेस ऑफिसर रुची पंत म्हणाल्या की, "रामोजी फिल्म सिटी हे केवळ एक स्टुडिओ नाही, तर एक लोकप्रिय थीम असलेले हॉलिडे डेस्टिनेशन आहे, जिथं नॅच्युरल लँडस्केप, सेट आणि मनोरंजन पार्क आहे, जे सर्व वयोगटातील लोकांसाठी काहीतरी खास ऑफर करते."

SATTE 2026 मध्ये रामोजी फिल्म सिटीनं वेधलं लक्ष (ETV Bharat)

"जगातील सर्वात मोठे इंटीग्रेटेड फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स म्हणून रामोजी फिल्म सिटीनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे. याठिकाणी आतापर्यंत 3,500 हून अधिक प्रतिष्ठित चित्रपटांचं चित्रीकरण झालं आहे. हिंदी, तेलगू, तमीळ आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसह अनेक भारतीय भाषांमधील चित्रपट रामोजी फिल्म सिटीच्या सेट आणि ठिकाणी चित्रित झाले आहेत. या सेट्सना चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान आहे," असंही रुची पंत यांनी सांगितलं.

रुची पंत यांच्या मते, रामोजी फिल्म सिटीमधील लोकप्रिय सेटपैकी "बाहुबली" सेट हे एक विशेष आकर्षण आहे, जे भारत आणि परदेशातील पर्यटकांना आकर्षित करते. भव्य राजवाडे, युद्धभूमी आणि भव्य वास्तुकलेची झलक सिनेमाप्रेमींसाठी एक अनोखा अनुभव देते. त्यांनी सांगितलं की, "याठिकाणी अनेक थीम-आधारित ठिकाणं तयार करण्यात आली आहेत, ज्यात शहरी बाजारपेठा, विमानतळ, रेल्वे स्थानके, राजवाडे, विदेशी रस्ते आणि लँडस्केप गार्डन्स यांचा समावेश आहे, जे चित्रपटांमध्ये सहजपणे वापरले जाऊ शकतात."

Ramoji Film City Steals The Spotlight At SATTE 2026, Welcomes Guests To Mega 46-Day Carnival
SATTE 2026 मध्ये रामोजी फिल्म सिटीनं वेधलं लक्ष (ETV Bharat)

"रामोजी फिल्म सिटी आपल्या पाहुण्यांना विंटेज बसेसमध्ये स्टुडिओ टूरचा एक अनोखा अनुभव देते. या दरम्यान, पर्यटक विविध सेट्स, शूटिंग स्पॉट्स आणि प्रोडक्शन सुविधांना भेट देऊ शकतात. हा टूर केवळ भेट देण्याचे ठिकाण नाही तर सिनेमाच्या जादुई जगाचा अनुभव घेण्याची संधी देखील देतो," असं रुची पंत यांनी सांगितलं. याचबरोबर, "फिल्म सिटीमध्ये पाच हॉटेल्स आहेत, ज्यामध्ये बजेट-फ्रेंडली निवासस्थानांपासून ते अति-लक्झरी हॉटेल्सपर्यंतची सुविधा आहे. येथील हिरवीगार बाग आणि मोकळे मैदान मेगा-इव्हेंट्स, डेस्टिनेशन वेडिंग्ज, कॉर्पोरेट मीटिंग्ज आणि सामाजिक मेळाव्यांसाठी खूप चांगले आहे. तसंच याठिकाणी 25 ते 25,000 लोकांपर्यंतचे कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले गेले आहेत," असं रुची पंत यांनी सांगितलं.

रामोजी फिल्म सिटीच्या इव्हेंट टीमला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्याचा व्यापक अनुभव आहे. कॉन्सेप्ट डेव्हलपमेंटपासून ते क्युरेशन, इंस्टॉलेशन आणि प्रोडक्शनपर्यंत, संपूर्ण प्रोजेक्ट एका प्रोफेशनल टीमद्वारे हाताळला जातो. तसंच एड शीरन आणि ए.आर. रहमान सारख्या पॉप स्टार आणि संगीतकारांच्या भव्य संगीत मैफिली इथं यशस्वीरित्या आयोजित केल्या गेल्या आहेत. या कार्यक्रमांनी फिल्म सिटीला एक प्रीमियम कार्यक्रम स्थळ म्हणून स्थापित केलं आहे," असं असं रुची पंत यांनी सांगितलं.

Ramoji Film City Steals The Spotlight At SATTE 2026, Welcomes Guests To Mega 46-Day Carnival
SATTE 2026 मध्ये रामोजी फिल्म सिटीनं वेधलं लक्ष (ETV Bharat)

23 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या 46 दिवसांच्या या कार्निव्हलमध्ये रुची पंत यांनी पर्यटक आणि चित्रपट प्रेमींचे स्वागत केलं. त्या म्हणाल्या की, "रामोजी फिल्म सिटी एक कार्निव्हल सुरू करत आहे, जिथं पाहुण्यांना रात्री फिल्म सिटी एक्सप्लोर करण्याची संधी मिळेल. तसंच हे कॉम्प्लेक्स रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहील, ज्यामुळं पर्यटकांना सुंदरपणे प्रकाशित केलेले सेट आणि गार्डन पाहता येईल. याशिवाय, कार्निव्हलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, लाईव्ह परफॉर्मन्स, फूड फेस्टिव्हल, कौटुंबिक मनोरंजन, कार्निव्हल परेड, एक नेत्रदीपक संगीतमय ग्लो गार्डन आणि 'मायालोक' यांचा समावेश असेल. हा जादुई कार्निव्हल तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी संस्मरणीय क्षण निर्माण करेल. हा 7 जूनपर्यंत चालणार आहे," असंही रुची पंत यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. एनसीईआरटीचा वादग्रस्त भाग ऑनलाइन काढून टाकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश, सरन्यायाधीशांनी याला 'कट' संबोधले
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोशल मीडियावर कहर, इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण, ट्रम्प तर जवळसुद्धा नाही
  3. लिंगबदल केलेल्या विद्यार्थ्याला महिलेचा उल्लेख काढत पुरुष म्हणून नव्या नावासह सुधारित डिग्री देण्याचे एसएनडीटीला कोर्टाचे आदेश