केजरीवालांना धक्का, राज्यसभा सभापतींनी 7 बंडखोर खासदारांना भाजपामधील विलिनीकरणाला दिली मान्यता
राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांच्या गटाच्या भाजपामधील विलिनीकरणाला राज्यसभा सभापतींनी मान्यता दिली आहे.

Published : April 27, 2026 at 1:58 PM IST
नवी दिल्ली : राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी आम आदमी पक्षातून (आप) बाहेर पडून राज्यसभेत स्वतंत्र गट स्थापन करत भाजपामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. तसंच त्यांनी यासंदर्भातील पत्र राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना दिलं होतं. यावर आज राज्यसभेच्या सभापतींनी निर्णय घेत राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांच्या गटाच्या भाजपामधील विलिनीकरणाला मान्यता दिली आहे. यामुळं आता आपच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या तीनवर आली आहे. तर राज्यसभेतील भाजपाच्या खासदारांची संख्या 113 झाली आहे.
राघव चड्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, संदीप पाठक, विक्रमजीत साहनी, स्वाती मालीवाल आणि राजिंदर गुप्ता या सात खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राज्यसभेच्या वेबसाइटनुसार, हे सर्व सातही खासदार भाजपाच्या सदस्य यादीत आहेत. तसंच सूत्रांनी सांगितलं की, शुक्रवारी या सातही खासदारांनी राज्यसभेच्या सभापतींकडे विलीनीकरणानंतर भाजपाचे खासदार म्हणून विचार करण्याची विनंती केली होती. आज त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली आहे.
MPs Raghav Chadha, Ashok Kumar Mittal, Harbhajan Singh, Sandeep Kumar Pathak, Dr. Vikramjit Singh Sahney, Swati Maliwal and Rajinder Gupta, who quit AAP to join BJP on 24th April, are now listed among the 113 Rajya Sabha MPs of BJP pic.twitter.com/Etof1vbb5g
— ANI (@ANI) April 27, 2026
रविवारी (26 एप्रिल) आम आदमी पक्षानं पक्ष बदललेल्या सात खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी राज्यसभेच्या सभापतींकडे केली होती. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सांगितलं होतं की, अलीकडेच आम आदमी पक्ष सोडून भाजपामध्ये विलीन होण्याची घोषणा केलेल्या सात खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी राज्यसभेच्या सभापतींकडे सादर केली होती. संजय सिंह यांनी सांगितलं होतं की, "आम आदमी पक्षानं संविधानाच्या दहाव्या अनुसूचीअंतर्गत एक याचिका दाखल केली आहे. राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना यावर लवकरात लवकर सुनावणी घेऊन निष्पक्ष निर्णय देण्याची विनंती केली आहे. तसंच या सात राज्यसभा खासदारांनी उचललेलं पाऊल 'पक्षबदल' आहे. हे कृत्य पक्षबदलविरोधी कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात आहे," असंही त्यांनी म्हटलं होतं.
#WATCH Delhi: On the merger of 7 AAP MPs with BJP, AAP MP Sanjay Singh says, " this decision of the rajya sabha chairman is based on the letter from the 7 mps to merge with the bjp. but when the chairman will take congnizance of my letter, which states that the membership of… pic.twitter.com/Rw4f7cXpZM
— ANI (@ANI) April 27, 2026
शुक्रवारी (24 एप्रिल) राघव चढ्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी आणि स्वाती मालीवाल यांनी आम आदमी पक्ष सोडला. तसंच या खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसंच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील हा पक्ष आपली तत्त्वं, मूल्यं आणि नैतिक आदर्शांपासून भरकटल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे, पक्ष सोडणाऱ्या या सात खासदारांपैकी सहा खासदार पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आले होते.
हेही वाचा :

