Bihar Students Protest : पाटण्यात पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पाण्याच्या फवाऱ्याचा मारा
बीपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांनी गांधी मैदानातून मोर्चा काढला. या आंदोलक विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

Published : August 25, 2026 at 6:37 PM IST
|Updated : August 25, 2026 at 8:07 PM IST
पाटणा : देशभरात नीट पेपरफुटीनंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात सीजेपीने आंदोलन केलं. सीजेपीच्या या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळालं. वाढता पाठींबा आणि दबावानंतर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र त्यानंतरही पेपरफुटीचं सत्र कायमच आहे. सध्या बिहारमधील पाटण्यात विद्यार्थ्यांकडून बीपीएससीची 70वी परीक्षा रद्द करावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येतंय. मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालण्यासाठी आंदोलक विद्यार्थी जमले होते. मात्र पोलिसांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालंय.
आंदोलक विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालायचा, असं ठरलं. त्यानुसार आंदोलक विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालण्यासाठी गांधी मैदानातून मोर्चा निघाला. तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी पूर्ण तयारी केली. पोलिसांनी बॅरिकेट्स लावले. पोलिसांनी आंदोलकांना जेपी गोलंबर इथं अडवलं. मात्र या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांचे बॅरिकेट्स रोखू शकले नाहीत.
VIDEO | Patna, Bihar: Visuals from Dakbungalow Chauraha where police have stopped protesting students during their march to CM residence.
— Press Trust of India (@PTI_News) August 25, 2026
A large number of BPSC (Bihar Public Service Commission) TRE-4 aspirants, along with other students, began their pre-announced march from… pic.twitter.com/XU5wzSx9Sl
आंदोलक विद्यार्थी बॅरिकेट्सवर चढले. या दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. तसंच पोलिसांनी या आंदोलक विद्यार्थ्यांवर फवाऱ्याने पाण्याचा मारा केला. लाठीचार्ज केल्याने विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय. या संपूर्ण प्रकारामुळे बिहारमधील राजकारणही चांगलंच तापलंय.
आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?
- बीपीएससीची 70वी परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात यावी.
- 1 हजार 799 पदांसाठीची उपनिरीक्षक भरती परीक्षा रद्द करण्यात यावी
- टीआरई-4 शिक्षक भरती परीक्षेसाठी एकस्तरीय परीक्षेची मागणी.
- प्रलंबित बीएसएससी परीक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी.
- बीईटी परीक्षा प्रक्रिया तात्काळ पुन्हा सुरू करण्याची मागणी.
- ग्रंथपाल आणि इतर शासकीय भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी.
- पारदर्शकतेसाठी, उमेदवारांना परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि ओएमआर शीट्स उपलब्ध करून देण्यात याव्यात.
- शासकीय भरती परीक्षांसाठी एक निश्चित वार्षिक वेळापत्रक असावं.
- प्रश्नपत्रिका फुटण्यास आणि परीक्षेत गैरप्रकार करण्यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी.
- भरती प्रक्रियेतील वयोमर्यादा, अधिवास धोरण आणि प्रलंबित नियुक्त्या यासंबंधीच्या मुद्द्यांवर धोरण तयार करण्यात यावं.
हेही वाचा :
सर्वोच्च न्यायालयानं तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांना बजावली नोटीस

