ETV Bharat / bharat

व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती भारत दौऱ्यावर, PM नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा

डेल्सी रॉड्रिग्ज बुधवारी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाल्या.

PM Modi, Venezuela's Acting President Rodriguez Hold Bilateral Talks
व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती भारत दौऱ्यावर, PM नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा (IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 4, 2026 at 3:13 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज सध्या पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (4 जून) नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं डेल्सी रॉड्रिग्ज यांची भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. तसंच, ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषधनिर्माण, आरोग्यसेवा, वाहतूक आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यावर भर दिला.

दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी वाढेल : यापूर्वी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी डेल्सी रॉड्रिग्ज यांची भेट घेतली आणि भारत व व्हेनेझुएला यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेची प्रशंसा केली. डेल्सी रॉड्रिग्ज यांच्या पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीमुळं दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी वाढेल, अशी आशा एस. जयशंकर यांनी व्यक्त केली. या भेटीनंतर परराष्ट्र मंत्र्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, "आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांना भेटून आनंद झाला."

ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्रांमध्ये भारत प्रमुख भागीदार : डेल्सी रॉड्रिग्ज बुधवारी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाल्या. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करणे हा त्यांचा उद्देश आहे. परराष्ट्र मंत्रालयानं देखील 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या दौऱ्याविषयी माहिती दिली असून, या दौऱ्यामुळं भारत-व्हेनेझुएला संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांमधील भागीदारीला गती मिळेल, असं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यासोबत असलेले व्हेनेझुएलाचे शिष्टमंडळ भारताच्या तांत्रिक आणि औद्योगिक क्षमतांबद्दल जाणून घेण्यासाठी तसंच सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी ऊर्जा, औषधनिर्माण आणि वाहन क्षेत्रांमधील विविध ठिकाणी भेट देईल. ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्रांमध्ये भारत व्हेनेझुएलाचा एक प्रमुख भागीदार राहिला आहे.

ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक : परराष्ट्र मंत्रालयानं पुढं असंही म्हटलं आहे की, भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी व्हेनेझुएलामध्ये ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक केली आहे. ऊर्जा क्षेत्र, व्यापार आणि 'ग्लोबल साउथ' (विकसनशील देशां) प्रति असलेल्या सामायिक वचनबद्धतेच्या आधारावर भारत आणि व्हेनेझुएला यांचे सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तसंच या भेटीमुळं दोन्ही देशांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होण्याची आणि विविध क्षेत्रांमधील सहभाग अधिक सखोल होण्याची अपेक्षा आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान, अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केल्यानंतर 5 जानेवारीला डेल्सी रॉड्रिग्ज यांनी व्हेनेझुएलाचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती.

हेही वाचा :

  1. विद्यार्थ्यांसाठी मोफत बस पास, खासगी रोजगार विनिमय व्यवस्था आणि बरेच काही; 'डीकें'नी राजकोष केला खुला
  2. मालवीय नगर अग्निकांड! पोलिसांनी हॉटेल मालक लवकेशला घेतले ताब्यात; मृतांचा आकडा 21 वर
  3. मुझफ्फरपूरच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अग्नितांडव; भीषण आगीत चौघांचा मृत्यू