ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोशल मीडियावर कहर, इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण, ट्रम्प तर जवळसुद्धा नाही

इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले जागतिक नेते आणि राजकारणी बनले आहेत.

PM Narendra Modi Instagram Followers
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 26, 2026 at 8:20 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरात ख्याती आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते 2014 ला पंतप्रधान झाल्यापासून तर त्यांची मोठी क्रेझ जगभरात दिसून येते. भाषण कौशल्य, राहणीमान, निर्णय क्षमता, विचारसरणी, सर्वांना सामावून घेण्याची क्षमता या विशेष गुणांमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात ओळखले जातात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक असा विक्रम केलाय, ज्यामुळं जगभरातील भलेभले नेतेही मागे पडले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 100 मिलियन फॉलोअर्स - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा डिजिटल टप्पा ओलांडला आहे. इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले जागतिक नेते आणि राजकारणी बनले आहेत. यामुळं जागतिक स्तरावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांची अतुलनीय कामगिरी अधोरेखित होते. मोदी यांनी 2014 मध्ये इंस्टाग्राम सुरू केलं होतं. तेव्हापासून त्यांचे फॉलोअर्स सातत्यानं वाढत होते. आता त्यांचं अकाऊंट हे जगातील सर्वात जास्त फॉलो केलं जाणारं आणि व्यस्त राजकीय प्रोफाइलपैकी एक म्हणून ओळखलं जात आहे.

पोस्ट होतात व्हायरल - या व्यासपीठाचा वापर अधिकृत कार्यक्रमांची माहिती, आंतरराष्ट्रीय भेटी, सार्वजनिक संपर्क उपक्रम, सांस्कृतिक क्षण आणि वैयक्तिक विचार सामायिक करण्यासाठी केला जातो. यामुळं विस्तृत आणि वैविध्यपूर्ण प्रेक्षकांशी जोडण्यास मदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एखादा व्हिडिओ, फोटो किंवा पोस्ट शेयर केली की लगेच काही सेकंदात लाईक्स, कमेंट्स आणि शेयरचा पाऊस पडतो. करोडोच्या संख्येनं फॉलोअर्स मोदी यांच्या पोस्ट शेयर करत असतात.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा दुप्पट फॉलोअर्स - या कामगिरीसह, पंतप्रधान मोदी आता इंस्टाग्रामवरील जागतिक नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधानांच्या फॉलोअर्सची संख्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा दुप्पट आहे. ट्रम्प यांचे 43.2 मिलियन फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत इतर जागतिक नेते खूप मागं आहेत. यात इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो 15 मिलियन फॉलोअर्स, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा 14.4 मिलियन फॉलोअर्स, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान 11.6 मिलियन आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली 6.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा -

  1. मोदी नेसेटमध्ये : भारताने गाझा शांतता योजनेला दिला पाठिंबा, 'दहशतवाद सर्वत्र धोकादायक' अशी केली घोषणा
  2. पंतप्रधान मोदींकडून 'मन की बात'मध्ये टी-20 विश्वचषकाचा उल्लेख; भारतीय खेळाडूंना उद्देशून केलं मोठं विधान