'अनेकांनी भारतातील सोमनाथ मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही'-पंतप्रधान मोदी
१०२६ मध्ये सोमनाथ मंदिरावर हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याला १००० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सोमनाथ पर्वमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले.

Published : January 11, 2026 at 5:27 PM IST
सोमनाथ (अहमदाबाद)- "१००० वर्षांपूर्वी आक्रमणकर्त्यांना वाटले की त्यांनी ही भूमी जिंकली आहे. परंतु आज १००० वर्षांनंतरही सोमनाथ मंदिरावरील ध्वज संपूर्ण जगाला भारताचं सामर्थ्य आणि क्षमता दाखवून देत आहे", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र यांनी केले. ते सोमनात मंदिराचं रक्षण करण्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या "सोमनाथ स्वाभिमान पर्व"मध्ये बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराचं रक्षण करताना प्राणांची आहुती देणाऱ्यांना आणि मंदिर संकुलाजवळ स्थापित सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली. सोमनाथ स्वाभिमान पर्वाचा भाग म्हणून आयोजित या मिरवणुकीत शौर्य आणि बलिदानाचं प्रतीक असलेल्या १०८ घोड्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोदींनी स्वतः एका पुजाऱ्याकडून ढोल घेत उभे राहून ते वाजवले. पंतप्रधानांनी चौकात असलेल्या हमिरजी गोहिल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. गोहिल यांनी १२९९ मध्ये दिल्लीमधील मुघल सैन्याच्या हल्ल्यापासून सोमनाथ मंदिराचं रक्षण करताना प्राण अर्पण केलं.
या कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले, "आज, देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक झाले आहेत. सोमनाथ मंदिर ट्रस्टचा विश्वस्त म्हणून या प्रसंगाची सेवा करण्याची संधी मिळाल्यानं मी स्वत:ला भाग्यवान समजतो. भारताच्या सौहार्द्याचं, श्रद्धेचं आणि संस्कृतीच्या स्वाभिमानाचे प्रतीक म्हणजे सोमनाथ मंदिर आहे. अनेक शतके सोमनाथ मंदिरावर वारंवार आक्रमण झालं. परंतु प्रत्येक वेळी मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. पुनरुज्जीवनाच्या या अखंड चक्रामुळे सोमनाथ भारताच्या संस्कृतीच्या शक्तिशाली प्रतीक झालं आहे".
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा आपल्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्या पूर्वजांनी प्राण धोक्यात घालून आपल्या श्रद्धेसाठी आणि महादेवासाठी सर्वस्व अर्पण केले होतं. अगदी १००० वर्षांपूर्वी, याच ठिकाणी वातावरण कसे असेल? या ठिकाणाचा प्रत्येक कण शौर्य आणि धैर्याचा साक्षीदार आहे."
१०२६ मध्ये गझनीच्या महमूदनं सोमनाथ मंदिरावर हल्ला केला होता. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध करणाऱ्या शक्ती अजूनही सक्रिय आहेत. त्यांना पराभूत करणं आवश्यक आहे - पंतप्रधान, नरेंद्र मोदी
सोमनाथ मंदिर अजूनही अभिमानानं उभं - पंतप्रधान मोदी म्हणाले, " स्वातंत्र्यानंतर गुजरातमध्ये सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध करणाऱ्या शक्ती अजूनही सक्रिय आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी भारतानं जागरूक, एकजूट आणि मजबूत राहण्याची गरज आहे. सोमनाथचा इतिहास विनाश आणि पराभवाचा नाही तर विजय आणि पुनर्बांधणीचा आहे. हे काळाचं चक्र आहे. अत्याचार आता इतिहासाच्या पानांवर बंदिस्त झाला असून सोमनाथ मंदिर अजूनही अभिमानानं उभं आहे".
वल्लभभाई पटेल यांच्या मार्गात अडथळे आणले- सोमनाथ स्वाभिमान पर्वाला मोदी संबोधित करत होते. पंतप्रधान म्हणाले, "ते तुष्टीकरणात गुंतलेल्यांनी अतिरेकी मानसिकता असलेल्यांना शरण गेले. द्वेष, अत्याचार आणि दहशतीचा खरा इतिहास आपल्यापासून लपवण्यात आला होता. हा हल्ला मंदिर लुटण्याचा प्रयत्न होता, असे आपल्याला शिकवण्यात आले. जर सोमनाथवर हल्ला संपत्ती लुटण्यासाठी केला गेला असता तर पहिला हल्ला पुरेसा झाला असता. परंतु वारंवार हल्ला करून देवतेचा अपमान करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्या मार्गात अडथळे आणण्यात आले".
हेही वाचा-

