ETV Bharat / bharat

मोठी बातमी! पवन हंस हेलिकॉप्टरचं अंदमानमध्ये आपत्कालीन लँडिंग, 7 जण सुरक्षित

अंदमान आणि निकोबार बेटांवर तांत्रिक बिघाडामुळे पवन हंस हेलिकॉप्टरला आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. स्थानिक मच्छिमारांनी आणि पोलिसांनी तातडीनं बचाव कार्य करून सर्वांना सुरक्षित ठिकाणी आणलं.

File Photo for representation
प्रतिकात्मक छायाचित्र (ANI)
author img

By ANI

Published : February 24, 2026 at 3:23 PM IST

|

Updated : February 24, 2026 at 3:36 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

श्री विजया पुरम : अंदमान आणि निकोबार बेट इथं आज मंगळवारी (24 फेब्रुवारी) सकाळी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. पोर्ट ब्लेअर येथून उड्डाण केलेल्या पवन हंस कंपनीच्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे मायाबंदर परिसरात आपत्कालीन लँडिंग करावी लागली. सुदैवानं हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहे.

हेलिकॉप्टर कंपनीनं काय सांगितलं? : कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित हेलिकॉप्टरनं सकाळी सुमारे 8:45 वाजता पोर्ट ब्लेअर येथून मायाबंदरकडे उड्डाण केलं होतं. मात्र, लँडिंगदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानं 'शॉर्ट लँडिंग'ची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मायाबंदर हेलिपॅडपासून सुमारे 300 मीटर अंतरावर समुद्रात आपत्कालीन लँडिंग करावी लागली. ही घटना सुमारे सकाळी 9:30 वाजता घडली.

हेलिकॉप्टरमध्ये 5 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. सुरुवातीला काहींना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र नंतर कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. सर्वांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवून प्राथमिक उपचार देण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पुढील तपास सुरू : घटनेची माहिती मिळताच, स्थानिक मच्छीमार आणि पोलीस पथकानं तत्काळ बचावकार्य सुरू केलं. दुर्गम परिसर असूनही बचाव पथकानं वेगानं कारवाई करत सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं. दरम्यान, घटनेचं नेमकं कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले असून सविस्तर चौकशी सुरू आहे.

हेही वाचा

Last Updated : February 24, 2026 at 3:36 PM IST