केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची नावे जाहीर; वाचा, संपूर्ण यादी
७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यापूर्वी राष्ट्रासाठी केलेल्या विशिष्ट आणि महत्त्वपूर्ण कार्याबद्दल ४५ व्यक्तींची प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. वाचा, संपूर्ण यादी.

Published : January 25, 2026 at 3:52 PM IST
|Updated : January 25, 2026 at 7:20 PM IST
नवी दिल्ली: केंद्र सरकारनं रविवारी २०२६ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हे प्रजासत्ताक दिनापूर्वी पुरस्कार जाहीर केले जातात. कर्नाटकच्या अंके गौडा आणि महाराष्ट्राच्या आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्रीनं सन्मानित केलं जाईल. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे भागवदास रायकवार आणि जम्मू आणि काश्मीरचे ब्रिजलाल भट यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं जाईल.
राष्ट्रपतींनी २०२६ सालासाठी १३१ पद्म पुरस्कारांना मान्यता दिली आहे. यादीत पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांपैकी १९ महिला आहेत. तर सहा परदेशी नागरिक, अनिवासी भारतीय (एनआरआय), भारतीय वंशाचे व्यक्ती (पीआयओ) आणि भारतातील परदेशी नागरिक (ओसीआय) श्रेणीतील आहेत. सोळा पुरस्कार विजेत्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे. क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि हॉकीपटू सविता पुनिया यांच्यासह भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर भुल्लर यांना पद्मश्रीनं सन्मानित केलं जाणार आहे. दिवंगत, प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) यांना कला क्षेत्रातील पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय, केटी थॉमस यांना सार्वजनिक सेवेसाठी पद्मविभूषण, सुश्री एन. रंजन यांना कला, पी. नारायणन यांना साहित्य आणि शिक्षणासाठी आणि दिवंगत व्ही.एस. अच्युतानंदन यांना सार्वजनिक सेवेसाठी पुरस्कार करण्यात आलं आहे.
Padma Awards | Late Dharmendra Singh Deol (Posthumous) to be conferred with Padma Vibhushan in the field of Art. pic.twitter.com/2IoKvJ8NBH
— ANI (@ANI) January 25, 2026
या श्रेणीत छत्तीसगडमधील बुद्री थाती आणि ओडिशातील चरण हेम्ब्रम, उत्तर प्रदेशातील चिरंजी लाल यादव आणि गुजरातमधील धर्मलाल चुन्नीलाल पंड्या यांचा समावेश आहे. गायिका अलका याज्ञिक, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी आणि अभिनेता मामूट्टी यांना पद्मभूषणाने सन्मानित केले जाईल. कल्लीपट्टी रामास्वामी पलानीस्वामी, डॉ. नोरी दत्तात्रेयुडू, पियुष पांडे (मरणोत्तर), एस.के.एम. मैलनंदन, शतावधानी आर. गणेश, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (मरणोत्तर), उदय कोटक, व्ही.के. मल्होत्रा (मरणोत्तर), वेल्लापल्ली नटेसन आणि विजय अमृतराज यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल. प्रसिद्ध टेनिसपटू विजय अमृतराज यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
Padma Awards | Late Dharmendra Singh Deol (Posthumous) to be conferred with Padma Vibhushan in the field of Art. pic.twitter.com/2IoKvJ8NBH
— ANI (@ANI) January 25, 2026
हा पुरस्कार विशेष का आहे?- भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. हे पुरस्कार कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक प्रशासन, विज्ञान, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान केले जातात. पद्मविभूषण हा असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. पद्मभूषण हा उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. तर पद्मश्री हा कोणत्याही क्षेत्रातील गुणवंत सेवेसाठी दिला जातो.
#WATCH | Padma Awards: Anke Gowda from Karnataka will be conferred the Padma Shri 2026 in the field of Literature and Education, as per sources
— ANI (@ANI) January 25, 2026
This year’s Padma Awards recognise a wide spectrum of unsung heroes from across the length and breadth of India. These include… pic.twitter.com/j6SaAleqST
७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यापूर्वी, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या विशिष्ट आणि अविचल सेवेबद्दल, 'अनामिक नायक' श्रेणी अंतर्गत किमान ४५ व्यक्तींची प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा रविवार संध्याकाळपर्यंत केली जाईल, असे वृत्तांमध्ये म्हटले आहे. या व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात अथक आणि निष्ठेनं काम करून आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. तसेच नागरिकांचे जीवनमान चांगले केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड आणि नागरी संरक्षण सेवांमधील सुमारे १,००० कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात आली आहे.
यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी
- भगवानदास रायकर (मध्य प्रदेश)
- भिकल्या लाडक्या धिंडा (महाराष्ट्र)
- ब्रिजलाल भट्ट (जम्मू आणि काश्मीर)
- चरण हेमब्रम (ओडिशा)
- चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)
- डॉ पद्मा गुरमेट (जम्मू आणि काश्मीर)
- कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरळ)
- महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)
- नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)
- ओथुवर थिरुथनी (तामिळनाडू)
- रघुपत सिंग (उत्तर प्रदेश)
- रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)
- राजस्तपति कलाईप्पा गौंडर (तामिळनाडू)
- सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड)
- श्रीरंग देवबा लाड (महाराष्ट्र)
- तिरुवरूर बक्थावत्सलम (तामिळनाडू)
- अंके गौडा (कर्नाटक)
- आर्मिडा फर्नांडिस (महाराष्ट्र)
- डॉ श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)
- गफ्फारुद्दीन मेवाती (राजस्थान)
- खेम राज सुंदरियाल (हरियाणा)
- मीर हाजीभाई कासमभाई (गुजरात)
- मोहन नगर (मध्य प्रदेश)
- नीलेश मांडलेवाला (गुजरात)
- आर अँड एस गोडबोले (छत्तीसगड)
- राम रेड्डी मामिदी (तेलंगणा)
- सिमांचल पात्रो (ओडिशा)
- सुरेश हनगवाडी (कर्नाटक)
- तेची गुबिन (अरुणाचल प्रदेश)
- युम्नाम जत्रा सिंग (मणिपूर)
- बुधरी ताठी (छत्तीसगड)
- डॉ कुमारसामी थांगराज (तेलंगणा)
- डॉ पुण्नियामूर्ती नटराजन (तामिळनाडू)
- हेली वॉर (मेघालय)
- इंद्रजित सिंग सिद्धू (चंदीगड)
- के. पाझनिवेल (पुडुचेरी)
- कैलासचंद्र पंत (मध्य प्रदेश)
- नुरुद्दीन अहमद (आसाम)
- पोकिला लेकटेपी (आसाम)
- आर. कृष्णन (तामिळनाडू)
- एस.जी. सुशिलेम्मा (कर्नाटक)
- तागा राम भील (राजस्थान)
- विश्वबंधू (बिहार)
- धर्मिकलाल चुनीलाल पंड्या (गुजरात)
- शफी शौक (जम्मू आणि काश्मीर)

