ETV Bharat / bharat

30 हजारांची लाच घेताना खाण अधिकाऱ्याला अटक; छापेमारीनंतर 4 कोटींची रोकड जप्त, दक्षता विभागाची कारवाई

बुधवारी दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी देवब्रत मोहंती यांच्या तीन ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले.

cuttack mining deputy director arrested by vigilance while taking bribe
30 हजारांची लाच घेताना खाण अधिकाऱ्याला अटक; छापेमारीनंतर 4 कोटींची रोकड जप्त, दक्षता विभागाची कारवाई (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 25, 2026 at 3:34 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

भुवनेश्वर : ओडिशातील कटक सर्कलचे खाण उपसंचालक देवब्रत मोहंती यांना मंगळवारी रात्री एका परवानाधारक कोळसा व्यापाऱ्याकडून तीस हजार रुपयांची लाच घेताना दक्षता विभागाने (Vigilance Department) पकडले. यानंतर बुधवारी दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी देवब्रत मोहंती यांच्या तीन ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या छाप्यांमध्ये त्यांच्या घरातून 4 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : दक्षता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खाण उपसंचालक देवब्रत मोहंती हे कोळसा डेपोचे योग्य कामकाज सुनिश्चित करण्याचे आणि वाहतूक परवाने देण्याचे आश्वासन देऊन लाच घेत होते. त्याच्या अटकेनंतर भुवनेश्वर दक्षता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच देबब्रत मोहंती यांची अधिक चौकशी सुरू आहे. दक्षता विभागाच्या ताज्या माहितीनुसार, बुधवारी भुवनेश्वरमधील श्रीविहार नेचर्स अपार्टमेंट्समधील फ्लॅट क्रमांक 302 येथील देवब्रत मोहंती यांच्या निवासस्थानातून 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त करण्यात आली. दरम्यान, दक्षता विभागाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जप्त करण्यात आलेली रोख रक्कम असल्याचं विभागानं म्हटलं आहे.

अजूनही छापेमारी सुरू : अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे पैसे ट्रॉली बॅग आणि कपाटात लपवण्यात आले होते. याव्यतिरिक्त, देवब्रत मोहंती यांच्या ऑफिसच्या ड्रॉवरमधून 1 लाख 20 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. भद्रक मठसाही येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरावर आणि कटकमधील त्यांच्या ऑफिसवरही छापे टाकण्यात येत आहेत. याशिवाय, दक्षता विभागानं भुवनेश्वर टेकड्यांजवळील 2400 चौरस फूट, दुमजली इमारतीवर आणि सुनलंका गावाजवळील 130 चौरस मीटर, दुमजली इमारतीवर छापा टाकला. दरम्यान, भुवनेश्वर दक्षता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. तसंच अजूनही छापेमारी सुरू आहे. या छापेमारीनंतर, त्याच्या सर्व मालमत्तेचं मूल्यांकन केलं जाईल.

हेही वाचा :

  1. अजित पवार विमान अपघाताच्या चौकशीत नवा ट्विस्ट, DGCA नं VSR व्हेंचर्सच्या चार लिअरजेट विमानांवर बंदी घातली
  2. एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेला शब्द पाळला
  3. 'मी कोणालाही संस्थेची बदनामी करू देणार नाही'-एनसीईआरटी पुस्तकातील मजकुरावरून सरन्यायाधीशांनी घेतला आक्षेप