ETV Bharat / bharat

दिल्ली स्फोट प्रकरण : लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचं नवीन सीसीटीव्ही फुटेज आलं बाहेर, पाहून बसेल हादरा

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाचं नवीन सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं आहे.

DELHI BLAST CCTV FOOTAGE
दिल्ली स्फोट (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 13, 2025 at 12:01 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात डॉक्टर उमर नबी ठार झाल्याचं डिएनए चाचणीतून स्पष्ट झालं. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ संध्याकाळी गर्दीत पांढऱ्या रंगाच्या कारचा स्फोट झाला. या स्फोटात तब्बल 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता या स्फोटाचं एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ रेकॉर्ड झाला व्हिडिओ : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटात तब्बल 12 नागरिकांचा बळी गेला. या स्फोटाचं नवीन सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळील ट्रॅफिक कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये, कार, ऑटो रिक्षा आणि इतर वाहनं हळूहळू जात असल्याचं दिसून आलं आहे. त्यानंतर काही वेळानं आग लागल्याचं या फुटेजमध्ये दिसून येत आहे. आग लागल्यानंतर काही सेकंदातच गाडी आगीनं वेढली असल्याचं दिसून येते. त्यानंतर आकाशात धुराचे लोट उठताना दिसून मोठा स्फोट झाल्याचं दिसून येते.

दिल्ली स्फोट प्रकरण : लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचं नवीन सीसीटीव्ही फुटेज (ETV Bharat)

रोडवरील वाहनांना बसला हादरा : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट इतका भीषण होता, की रोडवरील वाहनांना त्याचा मोठा हादरा बसला. जवळपासच्या अनेक वाहनांचं या स्फोटानं मोठं नुकसान झालं. जखमींना मदत करण्यासाठी अनेक नागरिक धावले. मात्र यावेळी परिसरात मोठा गोंधळ उडाला. बुधवारी लाल किल्ला क्रॉसिंगवर बसवलेल्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केलेला आणखी एका सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये हा स्फोट रेकॉर्ड झाल्याचं दिसून आलं. या फुटेजमध्ये लाल किल्ला क्रॉसिंगवर स्ट्रीटलाइट्सखाली कार, बाईक आणि बस पुढं येत असताना मंद गतीनं वाहतूक सुरू असल्याचं दिसून येते.

हेही वाचा :

  1. दिल्ली स्फोट प्रकरण : कोणी घडवून आणला स्फोट ? : डिएनएमधून बाहेर आली धक्कादायक माहिती
  2. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण: जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी, तब्बल 1 हजार संशयितांना घेतलं ताब्यात
  3. व्हॉईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल उघडकीस; जम्मू काश्मीरमधून संशयित डॉक्टरला पोलिसांनी घेतलं ताब्यात