ETV Bharat / bharat

इराण-इस्रायल संघर्ष : भारतानं स्थापन केला विशेष नियंत्रण कक्ष, देशनिहाय हेल्पलाइन क्रमांक जारी

भारतानं इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या माध्यमातून मिडल इस्टमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत मिळणार आहे.

Helpline Control Room for Stranded Indians
अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन नियंत्रण कक्ष (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 4, 2026 at 1:09 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे सध्या सर्वत्र तणावाचं वातावरण आहे. अशा स्थितीत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं मध्यपूर्व देशांमध्ये अकडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी विशेष नियंत्रण कक्ष (Special Control Room) स्थापन केला आहे. मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, हा नियंत्रण कक्ष दररोज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. युद्ध स्थितीत अ़डकलेले भारतीय नागरिक खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.

1800118797 (टोल फ्री)

+91 11 2301 2113

+91 11 2301 4104

+91 11 2301 7905

याशिवाय, संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे आपत्कालीन संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.

बहरीन: +973 39418071

इराण: +98 9128109115 / +98 912810910 / +98 932179359

इराक: +964 771 651 1185 / +964 770444 4899

इस्रायल: +972 54 7520711 / +972 54 2428378

जॉर्डन: +962 770 422 276

कुवेत: +965 65501946

लेबनॉन: +961 76860128

ओमान: +968 98282270 (व्हॉट्सअ‍ॅप) / 80071234

कतार: +974 55647502

रामल्ला (पॅलेस्टाईन): +970 592916418

सौदी अरेबिया (रियाध): +966 11 4884697 / 800 247 1234

सौदी अरेबिया (जेद्दा): +966 126648660 / +966 12 2614093

संयुक्त अरब अमिरात: +971 543090571 (व्हॉट्सअ‍ॅप) / 800 46342

पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी सतर्क राहावं आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वरील क्रमांकांवर तत्काळ संपर्क साधावा, असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे.

भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय : खरं तर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशातील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना केल्याचं स्पष्ट केलं आहे. या भागात तणाव सातत्यानं वाढत असल्यानं भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयानं भारतीय नागरिकांना संबंधित देशांतील भारतीय दूतावासांशी सतत संपर्कात राहण्याचा आणि पुढील सूचनांसाठी अधिकृत अद्ययावत माहितीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

मिडल ईस्टमध्ये अडकलेल्यांसाठी विशेष उड्डाणं : दरम्यान, आखाती देशांमध्ये अडकलेल्या शेकडो भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय विमान कंपन्यांकडून विशेष उड्डाणं चालविण्यात येत आहेत. मंगळवारी संध्याकाळी नागरी उड्यन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी मंगळवारी एकूण 24 उड्डाणे भारतीय विमान कंपन्यांकडून चालविण्यात आली.

बुधवारी एकूण 58 उड्डाणं चालविण्याची योजना आहे. त्यामध्ये 30 उड्डाणं इंडिगोकडून, तर 23 उड्डाणं एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसकडून चालविण्यात येणार आहेत. पश्चिम आशियातील काही भागांतील हवाई क्षेत्राच्या बदलत्या परिस्थितीमुळे आतापर्यंत भारतीय विमान कंपन्यांची 1,221 उड्डाणे आणि परदेशी विमान कंपन्यांची 388 उड्डाणं रद्द करण्यात आली असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.

प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या संबंधित विमान कंपनीकडून उड्डाणाच्या स्थितीची ताजे अपडेट्स तपासून घ्यावेत आणि केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे.

हेही वाचा