'संवाद आणि राजनैतिक मार्गानं संघर्ष संपवावा', पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थितीवर भारताची भूमिका
पश्चिम आशियातील संघर्ष वाढत असताना आखातमध्ये असलेल्या 1 कोटी भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

By PTI
Published : March 3, 2026 at 7:29 PM IST
|Updated : March 3, 2026 at 7:47 PM IST
नवी दिल्ली- इराणवर अमेरिकेसह इस्त्रायलनं हल्ले केल्यानंतर पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र होत चालला आहे. आखाती प्रदेशातील एक कोटी भारतीय नागरिकांच्या हिताला प्राधान्य असल्यानं भारतानं म्हटलं आहे. ऊर्जा पुरवठ्यातील संभाव्य अडथळ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. कारण, कच्च्या तेलाचा होणारा पुरवठा कमी झाला तर भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र, भारतानं अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा उल्लेख केलेला नाही.
जवळचा शेजारी म्हणून या प्रदेशाच्या सुरक्षा आणि स्थिरतेत भारताचं महत्त्वाचं योगदान आहे. हे लक्षात घेऊन संघर्ष लवकर संपवण्यासाठी "संवाद आणि राजनैतिक" प्रयत्न करण्याचं भारतानं आवाहन केलं आहे. सध्याच्या घडामोडी मोठ्या चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. पश्चिम आशियात राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं भारतानं म्हटलं आहे.
Statement by the Official Spokesperson on the ongoing conflict in the West Asia region ⬇️https://t.co/s1Qm6xIqbS
— Randhir Jaiswal (@MEAIndia) March 3, 2026
"आखाती प्रदेशात जवळजवळ एक कोटी भारतीय नागरिक राहून काम करतात. त्यांची सुरक्षा आणि कल्याण ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यांच्यावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या कोणत्याही घटनांपासून आम्ही वेगळं राहू शकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. आपल्या व्यापार आणि ऊर्जा पुरवठा साखळ्यादेखील या प्रदेशातून जातात. कोणत्याही मोठ्या अडथळ्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतात भारत व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांनाही ठामपणे विरोध करतो," असे परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
संघर्ष संपावा- गेल्या काही दिवसांत झालेल्या हल्ल्यांमध्ये काही भारतीय नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत अथवा बेपत्ता आहेत. त्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, " या पार्श्वभूमीवर, भारत हा संवाद आणि राजनैतिक कूटनीतीचे ठोसपणानं आवाहन करत आहे. आम्ही संघर्ष लवकर संपवण्याच्या बाजूने स्पष्टपणे बोलत आहोत. आधीच दुर्दैवानं अनेक जीव गेले आहेत. याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो."
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, " ते या प्रदेशातील सरकारे तसेच इतर प्रमुख भागीदारांच्या संपर्कात आहेत. पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या समकक्षांशी चर्चा केली आहे. सरकार बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून राष्ट्रीय हितासाठी संबंधित निर्णय घेईल," असे परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
हेही वाचा-

