१.१ कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी गणेश उइके ठार; ओडिशात सुरक्षा दलाला यश
ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलानं चकमकीत माओवादी नेता गणेश उईकेसह सहा नक्षलवादी ठार केलेत. गणेश उइके हा तेलंगणामधील रहिवासी होता.

Published : December 25, 2025 at 3:06 PM IST
|Updated : December 25, 2025 at 3:35 PM IST
भुवनेश्वर- ओडिशामध्ये सुरक्षा दलाला गुरुवारी नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलानं १.१ कोटी रुपयाचं बक्षीस असलेल्या गणेश उइके याला चकमकीदरम्यान ठार केलं आहे.
सुरक्षा दलाच्या कारवाईत सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यामध्ये ६९ वर्षांच्या गणेश उइकेचा समावेश आहे.ओडिशामध्ये नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं कारवाईची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार माओवादी सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेल्या उइकेवर १.१ कोटी रुपयांचं बक्षीस होते. तो ओडिसामध्ये बंदी असलेल्या संघटनेचा प्रमुख होता. चाकापद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जंगलामध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली.
#WATCH | Bhubaneswar: Top Maoist leader Ganesh Uike, carrying Rs1.1 crore bounty, killed in encounter
— ANI (@ANI) December 25, 2025
Odisha DGP Yogesh Bahadur Khurania says, " a major anti-naxal joint operation is underway on the border of ganjam district. this morning, the odisha police and security forces… pic.twitter.com/nF8uNwLktb
२३.६५ लाख रुपयांचे बक्षीस असलेले नक्षलवादी ठार- वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार माओवादी क्षेत्र समितीचा सदस्य बारी उर्फ राकेश आणि दलम सदस्य अमृत अशी मृत नक्षलवाद्यांची नावे आहेत. ते दोन्ही छत्तीसगडमधील रहिवासी होते. त्यांच्यावर एकूण २३.६५ लाख रुपयांचे बक्षीस होते. चकमकीनंतर सुरक्षा दलानं महिला नक्षलवाद्याचा मृतदेहदेखील ताब्यात घेतला आहे. मात्र, तिची अद्याप ओळख पटलेली नाही.
रिवॉल्व्हर, रायफल आणि वॉकी-टॉकीसेट जप्त- मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ओडिशा पोलीस एसओजीनं (विशेष अभियान समूह) लहान पथकाच्या मदतीनं जंगलात तपासणी मोहिम सुरू केली. यावेळी त्यांचा नक्षलवाद्यांबरोबर सामना झाला. त्यांनी जोरदार गोळीबार केल्यानंतर कारवाईत नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीनंतर सुरक्षा दलानं रिवॉल्व्हर, रायफल आणि वॉकी-टॉकीसेट जप्त केले आहेत. कारवाईत सुरक्षा दलाचं कोणतंही नुकसान झालं नाही. सुरक्षा दलानं परिसरातील तपासणी मोहिमेला आणखी वेग दिला आहे.
कारवाई महत्त्वपूर्ण ठरणार- ओडिशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्यासाठी आणि जनतेला सुरक्षित ठेवण्याकरिता नक्षलवाद्यांविरोधातील ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ओडिशा सरकार आणि सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांविरोधात कडक पवित्रा घेण्यात आल्याचा कारवाईमधून संदेश देण्यात आला आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईत ओडिशा पोलीस स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG), केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दल (BSF) यांनी सहभाग घेतला.
कोण होता गणेश उइके?- गेली चार वर्षे गणेश उइकेनं नक्षली कारवायांमध्ये सहभाग घेतला. तो तेलंगणामधील नलगोंडा जिल्ह्यातील चेंडूर मंडलच्या पुल्लेमाला गावचा रहिवासी होता. त्याला पक्का हनुंतू, राजेश तिवारी, चमरू आणि रुपा या नावांनीदेखील ओळखलं जातं होतं. देशातील सर्वात मोस्ट वाँटेड नक्षलवाद्यांमध्ये त्याचा समावेश होता. संघटनेच्या रणनीतीमध्ये त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. उइके हा छत्तीसगडमधील २०१३ मधील झीरम घाटी हत्याकांडाचा सूत्रधार होता. यात काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला होता. विविध राज्यांमधील अनेक हाय-प्रोफाइल नक्षलवादी हल्ल्यांमध्ये उइके सामील होता. गेल्या तीन वर्षांपासून तो ओडिशाच्या कंधमाल भागातून गनिमी कारवायांचे समन्वय साधत होता. तसेच नक्षलवादी जाळे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत होता.
हेही वाचा-

