मोठी बातमी! फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 21 जणांचा होरपळून मृत्यू
तामिळनाडूतून एक गंभीर घटना समोर आली आहे. फटाके बनवण्याच्या कारखान्यात मोठा स्फोट होऊन 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Published : February 28, 2026 at 3:42 PM IST
|Updated : February 28, 2026 at 5:28 PM IST
काकीनाड (आंध्रप्रदेश) : जिल्ह्यातील सामरलाकोटा तालुक्यातील वेटलापलेम गावात एका फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, काही महिला फटाके तयार करत असताना हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. या दुःखद घटनेत किमान 21 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 15 जखमी झाले आहेत. जखमींना त्वरीत रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसंच, काही लोक अद्याप कारखान्यात अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
मृतांमध्ये बहुतेक महिला : मृतांमध्ये बहुतेक महिला असल्याचं वृत्त आहे. स्फोट इतका भीषण होता की, काही कामगारांचे मृतदेह शेतात दूरवर फेकले गेले. कारखान्यात अजूनही स्फोट सुरू असल्याचं समजतं आहे.
कारखाना कोणाच्या मालकीचा? : आजूबाजूच्या 5 गावांमध्ये दाट धुराचे लोट पसरले असून, स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक लोक घाबरले आहेत. अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हा कारखाना अडापा नानी यांच्या कुटुंबीयांकडून चालवला जात असल्याचंही अधिकाऱयांनी सांगितलं. या गावात पूर्वीदेखील फटाक्यांच्या कारखान्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्याची नोंद आहे.
కాకినాడ జిల్లా వేట్లపాలెంలోని బాణాసంచా తయారీ కేంద్రంలో జరిగిన పేలుడు ఘటన తీవ్ర దిగ్భాంతిని కలిగించింది. ఈ ప్రమాదంలో పలువురు ప్రాణాలు కోల్పోవడం విచారకరం. ఘటనపై ఉన్నతాధికారులతో మాట్లాడాను. బాధితులకు అవసరమైన తక్షణ సాయం అందించాలని ఆదేశించాను. సహాయక చర్యలను పర్యవేక్షిస్తున్నాము. బాధిత…
— N Chandrababu Naidu (@ncbn) February 28, 2026
अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली माहिती : अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी अधिकाऱ्यांना तत्काळ मदत आणि बचावकार्य सुरु करण्याचे आदेश दिले. तसेच गृहमंत्री वांगलपुडी अनिता यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले असून, त्या सध्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. चंद्राबाबू सध्या विजयनगरम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला : स्फोटाबद्दल मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी शोक व्यक्त केला. या अपघातात अनेकांचा जीव गेल्यानं त्यांनी दुःख व्यक्त केलं. घटनेबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी पीडितांना त्वरित मदत करण्याचे आदेश दिले आहेत. चंद्राबाबूंनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं की, 'मदतकार्यांवर लक्ष ठेवून आहोत आणि बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करणार आहोत'.
यासोबतच, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ मदत उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यांनी गृहमंत्री अनिता यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार गृहमंत्री वांगलपुडी अनिता घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू सध्या विजयनगरम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

