'वडीलधाऱ्यांचा आदर करून आणि त्यांच्या जीवनानुभवातून शिकता येते'- मार्गदर्शी एमडी शैलजा किरण
एमडी शैलजा किरण यांनी पेद्दापुरम येथील श्री प्रकाश सिनर्जी स्कूलच्या 18 व्या वर्धापनदिन सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

Published : January 11, 2026 at 5:02 PM IST
हैदराबाद : शाळा म्हणजे केवळ वर्गखोल्या असलेली इमारत नाही, तर ते जिथे विद्यार्थी स्वप्ने पाहतात, असे आवार आहे. शिक्षण म्हणजे केवळ उपजीविका कशी कमवायची हे शिकणे नाही, तर ते जीवन कसे जगायचे हे शिक्षण असते. शिक्षण तुम्हाला दैनंदिन जीवनातील आव्हानांवर मात करण्याचे सामर्थ्य देते, असं मार्गदर्शी चिट फंड प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण म्हणाल्या. शनिवारी संध्याकाळी काकीनाडा जिल्ह्यातील पेद्दापुरम येथील श्री प्रकाश सिनर्जी स्कूलच्या 18 व्या वर्धापनदिन सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिलेल्या मार्गदर्शीच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) शैलजा किरण या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
काय म्हणाल्या शैलजा किरण? : "‘पाणी वाचवा...जीवन वाचवा' ही केवळ घोषणा नाही. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. पाण्याशिवाय परिस्थिती किती भयंकर असेल याची कल्पना करा. तुमच्या आजूबाजूला नळांवर किंवा घरामध्ये पाणी वाया जात असल्याचं दिसल्यास, ते थांबवा. अशा छोट्या कृतींचा मोठा परिणाम होईल. प्लास्टिक हा एक धोकादायक शत्रू आहे. ते शेकडो वर्षे मातीत आणि समुद्रात राहून पर्यावरणाचा नाश करतो. झाडे ही नैसर्गिक देणगी आहेत. रोपे लावल्यानं आणि त्यांचं संरक्षण केल्यानं आपल्याला अनेक दशके फायदा होईल. मार्गदर्शी चिट्सच्या वतीनं आम्ही तेलंगणामध्ये एक लाख रोपे लावत आहोत. येथे आलेल्या प्रत्येकानं आपल्या आयुष्यात किमान 100 रोपे लावावीत. तसचं शैक्षणिक विषयांच्या अभ्यासासाठी फोन, संगणक आणि इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानाचा फायदेशीर वापर करण्याचं आवाहन शैलजा किरण यांनी केलं.

रामोजी राव यांनी मूल्ये, संस्कृती आणि नातेसंबंधांना महत्त्व दिलं : शैलजा किरण यांनी सांगितलं की, रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक अध्यक्ष रामोजी राव यांनी नेहमीच मूल्ये, संस्कृती आणि नातेसंबंधांना महत्त्व दिलं. मूल्यांचं शिक्षण केवळ पुस्तकांतून मिळत नाही तर ते वडीलधाऱ्यांचा आदर करून आणि त्यांच्या जीवनानुभवातून शिकता येते. पालकांप्रमाणेच शिक्षक, शेतकरी, सैनिक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आदर केला पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमात श्री प्रकाश एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष के. केशवराव, श्री प्रकाश सायनर्जी स्कूलचे संचालक सी. एच. विजयप्रकाश यांनीही मनोगत व्यक्त केले. सी. एच. नरसिंह राव यांच्यासह अनेक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा -

