ETV Bharat / bharat

लुधियानामध्ये महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

पीएयू पोलीस ठाण्यात 'पोक्सो' कायद्यांतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Ludhiana Police registers FIR in rape case of minor girl from Maharashtra
लुधियानामध्ये महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोलिसांकडून गुन्हा दाखल (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 1, 2026 at 3:16 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

लुधियाना : पंजाबमधील लुधियानामध्ये महाराष्ट्रातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लुधियाना पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएयू पोलीस ठाण्यात 'पोक्सो' कायद्यांतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही यासंदर्भात माहिती दिली. तसंच आरोपींवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकं स्थापन करण्यात आली असून, त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

आईनं विचारल्यानंतर ही बाब उघड : मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पीडित 13 वर्षांची मुलगी मानसिकदृष्ट्या सुस्थितीत आहे. चुकीच्या संगतीत असलेल्या तिच्या काही मैत्रिणींनी तिलाही बिघडवण्यास सुरुवात केली. पीडित मुलीची आई कामावर जात असल्यामुळं ती अनेकदा घरी एकटीच असायची आणि याचकाळात तिला अमली पदार्थांचे व्यसन लागलं. पीडितेच्या आईनं सांगितलं की, तिच्या काही मैत्रिणी तिला लुधियानामधील ऋषी नगर मार्केटमध्ये बोलावून अमली पदार्थ देत होत्या. त्यानंतर नशेत असताना तिच्यावर हा अत्याचार करण्यात आला. हे घृणास्पद कृत्य तिच्यावर एकदा नव्हे, तर अनेकदा करण्यात आले. अखेरीस आईनं विचारल्यानंतर मुलीनं सर्वकाही सांगितलं.

लुधियाना पोलिसांकडून गुन्हा दाखल : दरम्यान, पीडितेच्या आईनं सांगितलं की, यापूर्वी पीडितेनं पीएयू पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर महाराष्ट्रातील पुण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर, जेव्हा तिथल्या पोलिसांनी पंजाब पोलिसांशी संपर्क साधला, तेव्हा पंजाब पोलिसांनी याप्रकरणी काल (31 ऑगस्ट) एफआयआर दाखल केला. या घटनेबाबत एसीपी जतिंदर पाल सिंग यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी विविध पथकं तयार करण्यात आली असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल. पीडितेचा जबाब न्यायालयात नोंदवला जाईल आणि लवकरच आरोपपत्र सादर केले जाईल."

हेही वाचा :

  1. दिल्लीत पुन्हा निर्भया प्रकरण! धावत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार, चालकासह कंडक्टरला अटक
  2. मोबाईल फोनवरून वाद, कर्नाटकात धाकट्या भावानं केली थोरल्या भावाची हत्या
  3. मुंबईकरांना महागाईचा धक्का! CNG 2 रुपयांनी महागला, PNG दरही वाढले; नवीन दर जाणून घ्या