ETV Bharat / bharat

कर्नाटकमधील दोन अपघातात सहा जणांचा मृत्यू; जखमींमध्ये कोल्हापूरच्या डीवायएसपींचा समावेश

कर्नाटकमधील चित्रदुर्गामध्ये शनिवारी रात्री झालेल्या अपघातात कोल्हापूरच्या डीवायएसपी वैष्णवी या जखमी झाल्या आहेत. तर त्यांच्या आईचा मृत्यू झाला.

Chitradurga accident news
चित्रदुर्ग अपघात (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 11, 2026 at 1:37 PM IST

|

Updated : January 11, 2026 at 2:54 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बंगळुरू- कर्नाटकमध्ये शनिवारी रात्री चित्रदुर्ग जिल्ह्यात दोन भीषण अपघात झाले. या अपघातात एकूण जणांचा मृत्यू झाला. जखमीमध्ये कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांचा समावेश आहे. अपघातामध्ये त्यांच्या आईचा मृत्यू झाला.

बिदर-श्रीरंगपटणा महामार्गावर कार अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला. अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या हिरीयूर हिंडरसकट्टे गावात हा अपघात झाला. विश्वनाथ (22), नानजुंडी (23), राहुल (23) आणि यशवंत (22) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व हिरीयूर तालुक्यातील नानजाय्यनकोटीग गावातील रहिवासी होते. सर्व मृतदेह हिरीयूरमधील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हिरीयूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात घडला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी तपास करून गुन्हा दाखल केला आहे.

अपघातानंतर गुन्हा दाखल- दुसरा भीषण अपघात हा टामाटाकल्लू गावाजवळील पुलाजवळ चारचाकीची लॉरीला धडक होऊन झाला. अपघातामध्ये कोल्हापूरच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील जखमी झाल्या आहेत. त्या तामिळनाडूवरून कुटुंबासह कोल्हापूरला येत होत असताना हा अपघात घडला. या अपघातात कार चालक राकेश (40) आणि वैष्णवींच्या आई कमला (65) यांचा मृत्यू झाला. जखमींना चित्रदुर्गा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर डीएसपी वैष्णवी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस स्टेशनचे भालचंद्र नाईक यांनी अपघातस्थळी भेट दिली आहे. तसेच गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Chitradurga Karnataka accident
भीषण अपघात (Source- ETV Bharat Reporter)

बिहारमधील अपघातात चार जणांचा मृत्यू- शनिवारी दाट धुक्यामुळे बिहारची राजधानी पाटणाजवळील बख्तियारपूर-मोकामा चौपदरी मार्गावर भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले. वेगानं येणाऱ्या चारचाकीची कंटेनर ट्रकला धडक झाली. त्यानंतर मागून येणाऱ्या चारचाकीनं इतर वाहनांना धडकली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील वडील आणि मुलीचा समावेश आहे. पोलिसांना आणि स्थानिक रहिवाशांना चारचाकीतून अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी खूप परिश्रम करावे लागले. सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्यानंतर क्रेनच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवण्यात आली. गॅस कटर वापरून चारचाकीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा-

Last Updated : January 11, 2026 at 2:54 PM IST