इस्रायल अमेरिकेचा इराणवर हल्ला : "मी ऑनलाईन नसलो तर समजून जा . . ." बक्सरच्या तरुणाची हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट
इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानं मोठी खळबळ उडाली. बिहारमधील बक्सरचा असलेला तरुण दुबईमध्ये अडकला आहे. या तरुणानं सोशल माध्यमात भावनिक पोस्ट शेयर केली.

Published : March 1, 2026 at 11:57 PM IST
पटना : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई हे अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले. हल्ल्यामुळे दुबई आणि इतर मुस्लीम देशांमधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. दरम्यान, दुबईमध्ये राहणारा बिहारमधील बक्सरचा रहिवासी सुजित कुशवाह यानं त्याच्या कुटुंबासोबत एक भावनिक पोस्ट शेअर केली. "मी ऑनलाईन नसलो, तर समजून जा, इथली परिस्थिती बिकट बनली आहे. माझं मोबाईल नेटवर्क कधीही गायब होऊ शकते, काळजी करू नका."
"मोठ्या स्फोटाच्या आवाजानं लोकांना हादरवून टाकलं. रस्ते निर्जन झाले होते आणि लोक घाबरून त्यांच्या खोल्यांमध्ये अडकले. प्रशासनानं सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला जात आहे." - सुजित कुशवाह, दुबईमध्ये अडकलेला भारतीय तरुण
दुबईमध्ये अडकला बिहारी तरुण : बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील रहिवासी सुजित कुशवाह हा गेल्या सहा महिन्यांपासून दुबईमध्ये काम करत आहे. सोशल मीडियावर त्यानं शेअर केलेल्या भावनिक पोस्टमुळे केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नाही, तर दुबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या नातेवाईकांसाठी चिंता निर्माण झाली आहे. सुजित यानं त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "जर मी ऑनलाइन दिसलो नाही, तर समजून घ्या की परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. माझं मोबाइल नेटवर्क कधीही गायब होऊ शकते. काळजी करू नका."
कुटुंबाची वाढली चिंता : सुजित कुशवाह याच्या पोस्टनं कुटुंबातील सदस्य हादरुन गेलले. त्याच्या चौसा घरात चिंतेचं वातावरण पसरलं. आईच्या डोळ्यांचा वारंवार मोबाईल स्क्रीनवर पडदा पडला. येणाऱ्या प्रत्येक कॉलवर वडील श्वास रोखून धरत होते. त्याच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितलं की, "सुजित म्हणाला की तो सध्या सुरक्षित आहे, परंतु परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे."
'रात्रीचं दृश्य भयानक होते' : सुजित म्हणाला की "रात्रीचं दृश्य भयानक होते. एका बाजूला मोठे स्फोट ऐकू येत होते आणि मोबाईल फोन अलर्ट सायरन सतत वाजत होते. मध्यरात्रीपासून झोप लागणं अशक्य होते. परिस्थिती अचानक इतकी बिघडली की युएईमधील संपूर्ण यंत्रणा ठप्प झाल्यासारखं वाटलं. सर्व कामगारांना ताबडतोब सुरक्षित खोल्यांमध्ये पाठवण्यात आलं. खबरदारी म्हणून, दोन दिवसांसाठी वर्क परमिट निलंबित करण्यात आले आहेत. रविवार आणि सोमवारी काम पूर्णपणे थांबवलं जाईल. अनेक सार्वजनिक आणि पर्यटनस्थळं देखील तात्पुरती बंद करण्यात आली आहेत."
घरी परतण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही : सुजित म्हणला की, "सध्या भारतात परतण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. भारतीय दूतावासानं आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. गरज पडल्यास भारतीय नागरिक संपर्क साधू शकतील." त्यानं त्याच्या कुटुंबाला तो पूर्ण खबरदारी घेत असून सुरक्षित ठिकाणी असल्याचं स्पष्ट केलं. या लढाईचे वर्णन मानवतेच्या विरोधात असल्याचं सांगून "आम्ही भारत आणि परदेशातील बुद्धिजीवींना शांततापूर्ण सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची विनंती करतो."
घरी असलेले पालक काळजीत : चौसा इथं, त्याचं घर, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी गजबजलेलं आहे. प्रत्येकजण फक्त एकच प्रश्न विचारत आहे, सुजित ठीक आहे का? दरम्यान, सुजितची आई भावनिकपणे म्हणते, "माझा मुलगा सुरक्षित आहे, हा सर्वात मोठा दिलासा आहे, परंतु जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत माझ्या हृदयाला शांती मिळणार नाही."
सरकारला आवाहन : सुजितच्या कुटुंबानं आणि गावकऱ्यांनी भारत सरकारला परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आणि आवश्यक असल्यास त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ठोस व्यवस्था करण्याचं आवाहन केलं आहे. परदेशात काम करणारे लाखो भारतीय देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देतात. म्हणून, संकटाच्या वेळी त्यांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे.
परिस्थिती तणावपूर्ण का आहे? : शुक्रवारी रात्री अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर, इराणनं मध्य पूर्वेतील अनेक ठिकाणी हल्ले सुरू केले आहेत, यात संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई शहराला लक्ष्य केलं आहे. हॉटेल्स आणि इमारतींवरही हल्ले करण्यात आले आहेत.
हेही वाचा :

