'जागतिक महिला दिना'निमित्त रामोजी फिल्म सिटीत महिलांना तिकीट दरात सवलत; महिनाभर खास कार्यक्रमाचंही आयोजन
महिलांना फिरण्याची आवड असेल तर त्यांना जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर संधी आहे. रामोजी फिल्म सिटीकडून महिलांना महिनाभरत तिकिटात सवलत देण्यात येणार आहे.

Published : March 1, 2026 at 3:02 PM IST
हैदराबाद- रामोजी फिल्म सिटी ही जगभरात प्रेक्षणीय स्थळांमुळे प्रसिद्ध आहे. अशा रामोजी फिल्म सिटीत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना तिकिटामध्ये खास सवलत दिली जाणार आहे. या सवलतीची संधी महिलांना 31 मार्चपर्यंत घेता येणार आहे.
महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं काम करून यश मिळवत आहेत. पुरुषांच्या तुलनेत आपण कुठंही कमी नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखविलं आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी विविध क्षेत्रात सर्वोच्च स्थानदेखील मिळविलं आहे. त्यामुळे महिलांना आणखी प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याकिरता रामोजी फिल्म सिटीमध्ये महिनाभर महिलांसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिला शक्तीला वंदन म्हणून आजपासून 31 मार्चपर्यंत महिलांना रामोजी फिल्म सिटीमधील तिकिटात खास सवलत देण्यात येते.
- रामोजी फिल्म सिटीमध्ये काय पाहाल?- सर्वच वयोगटातील महिलांना मनोरंजन, सिनेमॅटिक अनुभव घेण्यासाठी खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. रामोजी फिल्म सिटीच्या भेटीत तुम्हाला अनेक फिल्म सेट्स पाहता येतात. त्याचबरोबर राईड्स, साहस पर्यटन, लाईव्ह शो, फुलपाखरांचा बगिचा, व्हर्च्यूल शॉट, पक्षांचे पार्क, मोशन पिक्चर आणि अनेक आकर्षकेंद्र आहेत.

रामोजी फिल्म सिटीला भेट म्हणजे अविस्मरणीय अनुभव- रामोजी फिल्म सिटीमधील अनेक गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. चित्रपट कसा बनतो? हे अगदी सुरुवातीपासून पाहता येते. पर्यटकांना फिल्मसिटीमध्ये मायालोक पाहता येतो. चित्रपट शुटिंगमधील नवलाई पाहता येते. प्रत्येक जण चित्रपटगृहातील पडद्यावर झळकणाऱ्या चित्रपटामागे असलेले कलाकौशल्य, तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि दिग्दर्शकाची बुद्धिमत्ता जाणून घेऊ शकतो. रामोजी फिल्म सिटीमध्ये खास असलेली कार्निव्हिल परेडदेखील पाहता येते. त्याचबरोबर तुम्ही भागवतम सेट, लाईव्ह शो, जपानी गार्डन पाहून पर्यटनाचा भरपूर आनंद घेऊ शकता. खास असलेल्या राईड्स अनुभवण्याबरोबरच साहसी कार्यक्रम पाहून आनंदात भर घालू शकता.
सर्वच वयोगटातील महिलांना रामोजी फिल्म सिटीसाठी 1,111 रुपये आणि इतर जीएसटी शुल्कासह तिकीट खरेदी करता येते. तर 11 हून अधिक जणांचा ग्रुप असेल तर 999 रुपये आणि इतर जीएसटी शुल्कासह तिकीट खरेदी करता येते. त्यामुळे ग्रुपसह फिरण्याची आवड असणाऱ्यांना अत्यंत उत्साहानं आनंद साजरा करण्यासाठी खूप चांगली संधी आहे. त्यामुळे 'महिला महोत्सवा'त सहभागी घेऊन अविस्मरणीय असा आनंद घ्या. अधिक माहितीसाठी रामोजी फिल्म सिटीच्या वेबसाईटला https://www.ramojifilmcity.com/ भेट द्या अथवा 76598 76598 वर कॉल करा.
हेही वाचा-

