ETV Bharat / bharat

भारतीय सैन्याला मोठं यश, किश्तवाडमध्ये 7 मोस्ट वाॅन्टेड दहशतवाद्यांचा खात्मा; वर्षभर सुरू होतं ऑपरेशन

भारतीय लष्कारानं आज सोमवारी एक मोठा दावा केला आहे. चटरूच्या जंगल परिसरात वर्षभर चाललेल्या कारवाईत 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Indian Army Eliminates 7 Terrorists
भारतीय सैन्याला मोठं यश (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 23, 2026 at 1:48 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

जम्मू : भारतीय लष्कारानं आज सोमवारी (23 फेब्रुवारी) एक मोठा दावा केला आहे. लष्काराच्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्हातील चटरूच्या जंगल परिसरात सुमारे वर्षभर चाललेल्या कारवाईत 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

326 दिवस सुरू होती कारवाई : डोंगराळ भागात लपून बसलेल्या या दहशतवाद्यांच्या टोळीचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी व्यापक मोहिम राबवली होती. नागरी व लष्करी गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या अचूक माहितीनुसार, ही संयुक्त कारवाई तब्बल 326 दिवस सुरू होती. मजबूत गुप्तचर जाळ्याच्या मदतीनं विविध ठिकाणी संपर्क साधत अखेर सर्व 7 वाँटेड दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं.

या ऑपरेशनदरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. एफपीव्ही ड्रोन, सॅटेलाइट प्रतिमा, आरपीए/यूएव्ही तसेच अत्याधुनिक संवाद प्रणालींचा वापर करून शोधमोहीम राबवण्यात आली.

'धैर्य, चिकाटी आणि गुप्तचर यंत्रणांमुळे ऑपरेशन यशस्वी' : रविवारी (22 फेब्रुवारी) किश्तवाडमधील पासेरकुट परिसरात सुरक्षा दलांनी अव्वल दहशतवादी कमांडर सैफुल्लाह आणि त्याच्या दोन साथीदारांना ठार केलं होतं. यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी चटरूच्या डिचर भागात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.

दरम्यान, जानेवारी महिन्यात जंगल परिसरात झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला होता. 18 जानेवारीनंतर सुरक्षा दलांनी या भागात दहशतवाद्यांशी चकमक करण्याची ही चौथी वेळ होती. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जवानांचं धैर्य, चिकाटी आणि गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी झाली.

हेही वाचा