ETV Bharat / bharat

'आता दिल्लीत निवडणुका घ्या, भाजपाने 10 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर राजकारण सोडू': निर्दोष सुटल्यानंतर केजरीवाल यांचं आव्हान

अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वावर तसंच काँग्रेस पक्षावर टीका केली. तुरुंगातील त्यांचे दिवस आठवून ते भावनिकही झाले.

पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि इतर
पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि इतर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 27, 2026 at 10:15 PM IST

|

Updated : February 27, 2026 at 10:21 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली - दिल्ली अबकारी धोरण अर्थात कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्याच्या काही तासातच आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत भावनात्मक पण आक्रमक भूमिका मांडली. त्यांनी केंद्र सरकारवर थेट राजकीय हल्ला चढवला. राऊस एव्हेन्यू कोर्टानं केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सर्व २३ आरोपींना या वादग्रस्त प्रकरणातून दोषमुक्त केलं.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "आता दिल्लीत निवडणुका घ्या आणि काय होते ते पाहा. जर भारतीय जनता पार्टी (भाजपा) 10 पेक्षा जास्त जागा जिंकला तर मी राजकारण सोडेन." ते म्हणाले, "केजरीवाल यांना हटवण्याचा एकच मार्ग आता त्यांना मारणे हाच आहे. नाहीतर आम आदमी पार्टीने जितकी विकासकामे केली आहेत, त्यापेक्षा हजार पटीने अधिक विकासाची कामे पंतप्रधानांनी करायला हवीत."

"प्रामाणिकपणाचा सर्वात मोठा विजय"

या निकालाचं वर्णन प्रामाणिकपणाचा सर्वात मोठा विजय असं करून केजरीवाल यांनी न्यायालयाचा निर्णय केवळ कायदेशीर दिलासा म्हणून नव्हे तर नैतिक न्याय म्हणून घेता येईल. 'आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल'. न्यायपालिकेचे आभार मानून पत्रकार परिषदेला सुरुवात करताना केजरीवाल म्हणाले, "भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. मी विशेषतः त्या न्यायाधीशांचे आभार मानतो ज्यांनी धैर्य दाखवलं आणि दबावाला न जुमानता सत्याच्या बाजूने उभे राहिले. न्यायालयानं हे स्पष्ट केलं आहे की संपूर्ण प्रकरण केवळ गृहितकांवर आणि खोट्या साक्षींवर आधारित आहे."

'मी पैसा नाही, प्रामाणिकपणा कमावला'

केजरीवाल यांनी आपला राजकीय प्रवास सचोटीत आहे, असं प्रतिपादन केलं. ते म्हणाले, "मी माझ्या आयुष्यात पैसा कमावला नाही, मी प्रामाणिकपणाने सर्व गोष्टी कमावल्या आहेत. आज न्यायालयाच्या आदेशानं हे सिद्ध झालं आहे की केजरीवाल कट्टर इमानदार आहेत, मनीष सिसोदिया हे कट्टर इमानदार आहेत, संजय सिंह हे कट्टर इमानदार आहेत आणि आम आदमी पार्टी एक प्रामाणिक पक्ष आहे."

तुरुंगातून सुटल्यानंतर मौन बाळगल्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना केजरीवाल म्हणाले, "लोकांनी विचारलं की मी बाहेर आल्यानंतर शांत का होतो. मी फक्त राजकारणी नाही, जेव्हा मला तुरुंगात टाकलं जातं आणि माझ्या कुटुंबाला लक्ष्य केलं जातं तेव्हा त्याचा माझ्यावर परिणाम होतो. मी संपूर्ण देशासमोर निर्दोष सिद्ध झाल्यावरच बोलायचं ठरवलं. आज माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरलं आहे."

'आप' फोडण्याचे राजकीय कारस्थान'

सीबीआय कोणताही गुन्हेगारी कट किंवा मनी ट्रेल स्थापित करण्यात अयशस्वी ठरल्याच्या न्यायालयाच्या निरीक्षणाचा संदर्भ देत केजरीवाल यांनी या प्रकरणाला आपला पक्ष कमकुवत करण्याचा राजकीय हेतूने प्रेरित केलेला प्रयत्न असल्याचं म्हटलं. "दोन वर्षे हजारो पानांचे आरोपपत्र दाखल झाले, पण शेवटी काहीही निष्पन्न झाले नाही. पक्ष तोडण्यासाठी आम्हाला तुरुंगवास भोगावा लागला, पण आम्ही फुटलो नाही," असं ते म्हणाले. 'आप'च्या नेत्यांना भ्रष्ट म्हणून दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संसाधने वापरण्यात आली होती, असा दावा त्यांनी केला. "आम्हाला चोर आणि भ्रष्ट म्हणायला त्यांनी करोडो खर्च केले. आज आम्ही कट्टर इमानदार आहोत यावर कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे."

राजकीय विरोधकांवर हल्लाबोल

केजरीवाल यांनी इतर राजकीय व्यक्तींशीही तुलना केली. "मी तुरुंगात गेलो, पण रॉबर्ट वड्रा कधी तुरुंगात गेले आहेत का? मनीष सिसोदिया तुरुंगात गेले, पण राहुल गांधी गेले का? संजय सिंग तुरुंगात गेले, पण सोनिया गांधी गेल्या का?" विरोधी पक्षांनी यावर चिंतन करावे, असंही ते म्हणाले.

संबोधनादरम्यान भावनिक क्षण

केजरीवाल यांनी भावूक होत असताना तुरुंगातील त्यांचा काळ आणि त्यांच्या कुटुंबावर झालेला परिणाम याची आठवण करुन दिली. त्यांनी सांगितलं की त्यांचं एकमेव ध्येय सार्वजनिक सेवा होतं, तरीही त्यांना गुन्हेगारासारखं वागवलं गेलं. कठीण काळात खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल आणि कुटुंब तसंच पक्ष कार्यकर्त्यांना प्रेरणा दिल्याबद्दल त्यांनी पत्नी सुनीता केजरीवाल यांचे आभार मानले.

भविष्यातील राजकीय अजेंडा

या निकालामुळे आता आपच्या राजकीय रणनीतीला आकार मिळेल, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. त्यांनी 1 मार्च रोजी जंतरमंतर येथे "रोजगार दो - सामाजिक न्याय दो" रॅलीची घोषणा केली. त्यांनी भाजपावर दिल्लीतील बस मार्शल, मोहल्ला क्लिनिक कामगार आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना त्यांच्या नोकरीतून काढून टाकल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेनं केजरीवाल यांच्या राजकीय पवित्र्यात बदल झाल्याचे संकेत दिले. निकालानंतर गप्प बसण्यापेक्षा अधिक चेवानं पुन्हा मुसंडी मारण्याची त्यांची तयारी दिसून आली.

हेही वाचा...

  1. अरविंद केजरीवाल यांची निर्दोष सुटका केल्यानंतर पत्नी सुनीता केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, मानले देवाचे आभार
  2. दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांची निर्दोष मुक्तता; निकालानंतर केजरीवालांना रडू कोसळलं
Last Updated : February 27, 2026 at 10:21 PM IST