ETV Bharat / bharat

लग्नाला दिला नकार, तरुणानं जेवणासाठी बोलावून गर्लफ्रेंडची केली हत्या

पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली आहे.

Girlfriend refused to marry : Boyfriend killed girlfriend inviting her for dinner
लग्नाला दिला नकार, तरुणानं जेवणासाठी बोलावून गर्लफ्रेंडची केली हत्या (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 29, 2026 at 3:32 PM IST

|

Updated : June 29, 2026 at 8:18 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घडना घडली आहे. एका तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याचं खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं आहे. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानं संतापलेल्या तरुणानं चाकूने वार करून तिची हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली आहे.

गर्लफ्रेंडची चाकूनं वार करून हत्या : ही घटना बंगळुरूमधील महालक्ष्मी लेआउट येथील पाईपलाईन रोडवर रविवारी (28 जून) रात्री उशिरा घडली. लग्नास नकार दिल्यानं एका तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडची चाकूनं वार करून हत्या केली. अंजली (23) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. तर राजीव असं आरोपी तरुणाचं नाव आहे. राजीव यानं अंजली हिच्या मानेवर चाकूनं वार करून तिला ठार केलं. या घटनेनंतर पोलिसांनी राजीव याला अटक केली आहे.

तीन ते चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते : अंजली आणि राजीव हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अंजली आणि राजीव या दोघांच्याही कुटुंबांना याची कल्पना होती. मात्र, राजीवची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळं अंजलीचे कुटुंब त्यांच्या लग्नाला परवानगी देण्यास तयार नव्हते. अंजलीनं आपल्या कुटुंबाचा निर्णय स्वीकारला आणि ती राजीवपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव अंजलीशी लग्न करण्याचा वारंवार आग्रह करत होता.

लग्नाला नकार दिल्यानं चाकूनं वार : रविवारी (28 जून) रात्री साडेआठ वाजता राजीवनं अंजलीला जेवणासाठी पाईपलाईन रोडवर बोलावलं होतं. यावेळी दोघांमध्ये पुन्हा लग्नाची चर्चा सुरू झाली, पण अंजलीनं त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात राजीवनं अंजलीच्या मानेवर चाकूनं वार केला. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी अंजलीला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी सांगितलं की, मृतदेह शवविच्छेदनासाठी एम.एस. रामय्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. मुंबई गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीने डेहराडूनमधील व्यावसायिकाचे केले अपहरण आणि 25 लाखांची केली मागणी
  2. हरिद्वारमध्ये भीषण रस्ते अपघात! रोडवेज बस आणि पिकअप ट्रकची धडक; 3 जण ठार, 4 जखमी
  3. आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, रेल्वे पूल कोसळला; अमित शाहांनी घेतला परिस्थितीचा आढावा
Last Updated : June 29, 2026 at 8:18 PM IST