दिल्लीत लॉरेन्स बिश्नोई याच्या वकिलावर अंदाधुंद गोळीबार; एक जण जखमी
दिल्लीत मंगळवारी रात्री लॉरेन्स बिश्नोई याचे वकील दीपक खत्री यांच्या कारवर गोळीबार झाला. अज्ञात हल्लेखोरांनी कारवर अनेक राउंड फायर केले. यात एका व्यक्तीला दुखापत झाली.

Published : February 25, 2026 at 11:48 AM IST
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना घडली. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या लीगल टीमच्या एका सदस्यावर हा गोळीबार करण्यात आला आहे. मंगळवारी (24 फेब्रुवारी) रात्री उशिरा काश्मिरी गेट आयएसबीटीजवळ गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या दीपक खत्री नामक वकिलाच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. लॉरेन्स बिश्नोईशी असलेल्या दीर्घकालीन वैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
ही घटना मंगळवारी रात्री सुमारे 10:30 वाजता घडली. दीपक खत्री हे आपल्या 4 सहकाऱ्यांसोबत हनुमान मंदिराकडून आयएसबीटीकडे जात असताना, स्कूटरवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. या हल्ल्यात खत्री यांच्यासोबत असलेला एक जण जखमी झाला आहे.
पोलिसांनी काय सांगितलं? : ज्वाइंट सीपी माधुर वर्मा यांनी सांगितलं की, दीपक खत्री एक वकील आहेत आणि रात्री सुमारे 10:30 वाजता ते चार सहकाऱ्यांसोबत कारनं आयएसबीटीकडे जात होते. त्यावेळी तीन अज्ञात हल्लेखोर स्कूटरवरून आले, त्यातल्यापैकी एकाकडे शस्त्र होते आणि त्यानं कारवर अनेक राऊंड फायर केले. या गोळीबारात खत्री यांचे साथीदार संदीप जखमी झाले. त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
ज्वाइंट सीपी म्हणाले की, दीपक खत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांची विस्तृत माहिती घेतली जात आहे. प्राथमिक माहितीमध्ये असं समोर आलं आहे की, दीपक खत्री यांना शाहजाद भट्टी नावाच्या व्यक्तीकडून धमकी मिळाली होती. तथापि, पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली जात आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथकं गठित करण्यात आली आहेत. पोलिसांचा दावा आहे की, लवकरच या संपूर्ण घटनेचा उलगडा केला जाईल. परिसराची घेराबंदी करून सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहेत. डीसीपी राजा बांठिया यांनी आरोपींची ओळख पटवून त्यांची अटक करण्यासाठी विशेष पथकं तयार केली आहेत.
#WATCH दिल्ली | जॉइंट CP मधुर वर्मा ने कहा, " दीपक खत्री एक वकील हैं। उनके साथ चार साथी थे। वे रात करीब 10:30 बजे कश्मीरी गेट इलाके में अपनी कार से isbt जा रहे थे। शुरुआती जानकारी के मुताबिक, स्कूटर पर सवार तीन अनजान हमलावरों ने, जिनमें से एक हथियारबंद था, गोलियां चलाईं। उनके एक… https://t.co/vZvy3sVbuD pic.twitter.com/ePHtB6Aq6K
— ANI_HindiNews (@AHindinews) February 24, 2026
लॉरेन्स बिश्नोई आणि टोळीवर अनेक गुन्हे : लॉरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात आहे, त्याच्यावर खून, खंडणी आणि खंडणी यासारखे अनेक आरोप आहेत. बिश्नोई टोळीनं अलीकडेच रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. हे प्रकरण जुन्या वैमनस्यातून आहे की, आणखी काही आहे? हे ठरवण्यासाठी पोलीस प्रत्येक बाजूंनी तपास करत आहेत.
हेही वाचा

