ETV Bharat / bharat

17 राज्य-58 हजार किमी प्रवास, 12 सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, मध्य प्रदेश पोलिसांची धडक कारवाई

देवास पोलिसांनी 17 राज्य पिंजून काढत 12 सायबर ठगांचा टप्प्यात कार्यक्रम केला. तसंच पोलिसांनी 55 लाख रुपयांची रोकड जप्त केली.

Representational Image
प्रातिनिधिक फोटो (Getty Images)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 24, 2026 at 8:20 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

देवास : सायबर क्राईममध्ये गेल्या काही वर्षांत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नागरिकांना कॉलद्वारे धमकावून/घाबरवून तुम्हाला डफ डीजीटल अरेस्ट करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर या सायबर ठगांकडून सर्वसामांन्याकडे पैशांची मागणी केली जाते. अनेक जण घाबरुन आणि बदनामी होऊ नये म्हणून सायबर ठगांना पैसा पाठवतात. मध्य प्रदेशमधील देवास पोलिसांनी सर्वसामांन्यांची अशाच प्रकारे लूट करणाऱ्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. देवास पोलिसांनी तब्बल 17 राज्यांत छापे टाकत 12 जणांना अटक केली. या सायबर गुन्हेगारांनी देवासमधील एका व्यक्तीकडून 63 लाख रुपये उकळले होते.

निवृत्त कर्मचाऱ्याची 63 लाखांची लूट :- देवासमधील निवृत्त कामगार सुरेश इंगळे यांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली घाबरवण्यात आलं. या भामट्यांनी इंगळेंकडून 63 लाख रुपये उकळले. त्यानंतर पीडित इंगळे यांनी 1930 या सायबर हेल्पलाईनवर घडल्या प्रकाराची माहिती दिली.

सुरेश इंगळे काय म्हणाले? :- "मला मार्च 2026 मध्ये दूरसंचार विभाग आणि मुंबई क्राईम ब्राँचमधून अधिकारी असल्याचं सांगत फोन आणि व्हिडीओ कॉल आला होता. या व्यक्तींनी मला मनी लाँड्रिग प्रकरणात अडकवण्याची आणि अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलो होतो", असं इंगळे यांनी सांगितलं.

आरोपींनी पीडित व्यक्तीला 8 दिवस धमकावलं. भामट्यांनी या दरम्यान इंगळेंच्या बँक खात्यांची आणि गुंतवणुकीची माहिती मिळवली. भामट्यांनी तपासाच्या नावाखाली इंगळेंकडून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करुन घेतले. त्यानंतर इंगळेंनी 3 एप्रिलला तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी 4 एप्रिलला गुन्हा दाखल करुन घेतला. त्यानंतर देवास पोलिसांच्या 70 अधिकाऱ्यांच्या 19 पथकांकडून 127 दिवस तपास करण्यात आला.

17 राज्यांतून 12 जणांना अटक :- "या तपासादरम्यान आरोपींची बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि आर्थिक व्यवहारांबाबत अनेक महत्त्वाचे धागेदोरे उघडकीस आणले. तपासाद्वारे एका आंतरराज्यीय नेटवर्कमध्ये प्रवेश मिळवला. या दरम्यान एकूण 17 जिल्ह्यातील 33 जिल्हे पिंजून काढले. या दरम्यान जवळपास 58 हजार 315 किमी प्रवास केला. त्यानंतर सायबर क्राईम करणाऱ्या 12 जणांना अटक केली", अशी माहिती पोलीस अधीक्षक पुनीत गेहलोत यांनी दिली.

11 जणांची तुरुंगवारी :- पोलिसांनी राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली आणि बिहारसह 17 राज्यांमध्ये कारवाई केली. पोलीस अधीक्षक पुनीत गेहलोत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी 12 पैकी 11 जणांना जेलमध्ये पाठवलंय. तर एकाची चौकशी सुरु आहे. पोलिसांना भामट्यांकडून 54 लाख 84 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

सर्वसामांन्यांना पोलीस अधिक्षकांचं आवाहन :- डीजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. जर कुणी पोलीस अधिकारी किंवा तपास संस्थेचा माणूस असल्याचं सांगून व्हिडीओ कॉल किंवा कॉलद्वारे तुम्हाला धमकावून पैशांची मागणी केल्यास घाबरु नका. ते सायबर गुन्हेगार असतात. त्यामुळे अशा स्थितीत पोलिसांत तक्रार नोंदवा. तसंच सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधा", असं आवाहन पोलीस अधीक्षक पुनीत गेहलोत यांनी केलंय.

हेही वाचा :

कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा करणार आंदोलन, 5 सप्टेंबरला दिल्लीत मोर्चाचं आयोजन