दिल्ली स्फोट प्रकरण : हल्द्वानीतील मौलानाची कसून चौकशी, मोबाईल, लॅपटॉप केला जप्त
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएनं हल्द्वानी मशिदीतील मौलाना असीम कासमी याला ताब्यात घेतलं. त्याचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.

Published : November 30, 2025 at 4:29 PM IST
देहरादून : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांनी हल्द्वानी मशिदीतील मौलाना असीम कासमी याला ताब्यात घेतलं. चौकशीनंतर त्याची सुटका करण्यात आली आहे. त्याचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. चौकशीनंतर काल रात्री उशिरा मौलाना याला सोडण्यात आलं.
मौलाना असीम कासमीचे देशविरोधी संघटनांशी संबंध : हल्द्वानी मशिदीचा मौलाना असीम कासमी याचे देशविरोधी संघटनांशी संबंध असल्याचा संशय होता. शुक्रवारी रात्री उशिरा मौलाना असीम आणि त्याच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं. गरज पडल्यास मौलाना आणि त्याच्या सहकाऱ्याला पुढील चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. चौकशीनंतर बाहेर पडल्यानंतर मौलानानं चौकशीबाबतची माहिती दिली. यापूर्वी एनआयएच्या पथकानं नैनीतालमधील तल्लीतल हरिनगर वॉर्डमधील मशिदीच्या इमामची सुमारे तीन तास चौकशी केली. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. अशाप्रकारे एनआयएनं दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नैनीताल आणि हल्द्वानी येथून ताब्यात घेतलेल्या तीन व्यक्तींना चौकशीनंतर सोडलं आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी कार बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक नागरिक जखमी झाले. या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडं (एनआयए) सोपवण्यात आला आहे. या स्फोटात एनआयएनं अनेक संशयितांना अटक केली आहे. देहरादूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू आहे. पोलीस पथकं सर्व सीमा आणि अंतर्गत मार्गांवर वाहनं आणि संशयित व्यक्तींची तपासणी करत आहेत. यात चेकिंग दरम्यान पोलिसांनी 1 हजार 400 पेक्षा अधिक वाहनं आणि 2,700 पेक्षा अधिक नागरिकांची तपासणी केली.
हेही वाचा :

