ETV Bharat / bharat

नेपाळमधील पुरातील मृतांचा आकडा 675 वर, तर 2500 लोक बेपत्ता; भोटेकोशी नदीची पाणी पातळी पुन्हा वाढली, हाय अलर्ट जारी

मध्य नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या 675 वर पोहोचली आहे, तर 2500 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.

Floods in Nepal Death toll reaches 675
नेपाळमधील पुरातील मृतांचा आकडा 675 वर (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 30, 2026 at 10:01 AM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली- बुधवारी आलेल्या विनाशकारी पुरामुळे नेपाळमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. मध्य नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या 675 वर पोहोचली आहे, तर 2500 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, नेपाळच्या हवामान विभागाने पूरग्रस्त भागात पुन्हा पाऊस आणि वादळाचा इशारा दिला असून, पुराबाबत नवीन सूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे बचाव कार्य आणि बाधित भागातील रहिवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. शनिवारीही सर्व आठ बाधित जिल्ह्यांमध्ये मृतदेह शोधण्याचे आणि बचाव कार्य सुरू होते.

पुराच्या पाण्यात वाढ; सतर्क राहा : नेपाळच्या 'नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटी'ने (NDRRMA) 'एक्स' (X) वर माहिती दिली आहे की, रसुवामधील भोटे कोशी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे रसुवा, नुवाकोट, धाडिंग आणि चितवन यांसारख्या बाधित जिल्ह्यांमध्ये शोध, बचाव आणि मदत कार्यात सहभागी असलेल्या सर्वांना, तसेच नदीकाठच्या भागातील रहिवाशांना आणि संबंधित इतरांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती उपलब्ध होताच पुढील अपडेट्स दिले जातील.

आठ जिल्ह्यांमध्ये युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य : पूरग्रस्त आठ जिल्ह्यांतून आतापर्यंत एकूण 675 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव पथके युद्धपातळीवर काम करत आहेत. 'नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटी'च्या नेतृत्वाखाली ही पथके लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आणि बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे नेपाळ-तिबेट सीमेजवळील हिमनदी फुटल्यामुळे बर्फ आणि खडकांचे ढिगारे वेगाने खाली आले. यासोबतच मोठ्या प्रमाणात पाणी, चिखल आणि मलबा मध्य नेपाळच्या अनेक भागांत पसरला. या प्रचंड प्रवाहाने शहरे आणि गावे उद्ध्वस्त केली, महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे नुकसान केले आणि अनेक जलविद्युत प्रकल्प वाहून नेले. सुमारे 2500 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

नेपाळमध्ये 108 भारतीय नागरिकांची सुटका : बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत 163 परदेशी नागरिकांसह सुमारे 2500 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. बाधित भागांत अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत. 29 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 10:30 वाजेपर्यंत नेपाळमध्ये बाधित झालेल्या भारतीय नागरिकांच्या स्थितीबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नेपाळमध्ये 108 भारतीय नागरिकांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली आहे, तर आणखी 50 भारतीय नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला आहे.

275 भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता : स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, 598 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळला पोहोचले आहेत. दरम्यान, सुमारे 900 भारतीय नागरिक अजूनही चीनमधून बाहेर पडलेले नाहीत. ते सर्वजण सुरक्षित असून बीजिंगमधील भारतीय दूतावास त्यांच्याशी थेट किंवा स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. मंत्रालयाच्या माहितीनुसार, 275 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत, तर भारतीय वंशाचे 128 लोकही बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.

भारताकडून मदत आणि साहित्याचा चौथा साठा रवाना : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जाहीर केले की, भारताकडून 11 टन मदत साहित्य घेऊन जाणारे चौथे विमान नेपाळसाठी रवाना झाले आहे. याव्यतिरिक्त 230 फूट लांबीचा 'सिंगल-लेन मॉड्युलर स्टील पूल' उभारण्यासाठी आवश्यक साहित्य घेऊन 16 ट्रक नेपाळला पोहोचले आहेत. त्यांनी सांगितले की, आणखी सात 'बेली पूल' (Bailey bridges) उभारण्यासाठी आवश्यक साहित्यही लवकरच पाठवले जाईल. हे पूल उभारण्याच्या कामावर देखरेख करण्यासाठी तांत्रिक पथके लवकरच नेपाळमध्ये दाखल होतील. भारताने आतापर्यंत काठमांडूमध्ये एकूण 68.5 टन मदत साहित्य पोहोचवले आहे. यामध्ये अत्यावश्यक औषधे, पोर्टेबल जनरेटर, अन्नाची पाकिटे, पाणी शुद्ध करण्याच्या गोळ्या आणि तांत्रिक उपकरणांचा समावेश आहे.

नेपाळमधून भारतीय पर्यटकांचे नागपूरला आगमन : दरम्यान, पुरामुळे नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकांचा एक गट महाराष्ट्रातील नागपूरला परतला आहे. एका पर्यटकाने सांगितले की, ते जिथे थांबले होते त्या ठिकाणापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर पूर आला होता. ते काठमांडूमध्ये अडकले होते. त्या पर्यटकाने सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने त्यांना तिथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि नागपूरला परत आणण्यात आले.

एका छोट्याशा विश्रांतीमुळे रायपूरमधील पाच मित्रांचे प्राण वाचले : चहासाठी घेतलेल्या एका छोट्याशा विश्रांतीमुळे छत्तीसगड येथील रायपूरमधील पाच मित्रांचे प्राण वाचले. हे पाच मित्र पर्यटनासाठी नेपाळला गेले होते. बुधवारी 'भोटे कोशी' आणि 'त्रिशूली' नद्यांना आलेल्या पुराच्या तडाख्यातून ते थोडक्यात बचावले. शनिवारी ते रायपूरमधील 'माना कॅम्प' येथील आपल्या घरी परतले. नेपाळमधून सुरक्षित परतलेल्या या तरुणांची नावे नारायण सेन, दिनेश ओझा, प्रेम सिंग जगत, यतेंद्र प्रकाश आणि दिनेश सिंग ठाकूर अशी आहेत. या पाचही जणांचे वय 50 ते 60 वर्षांच्या दरम्यान असून ते रायपूरमधील माना कॅम्प भागात राहतात. सलून चालवणारे नारायण सेन म्हणाले, "आम्ही नशीबवान होतो की, 26 ऑगस्ट रोजी जेव्हा अचानक पूर आला, तेव्हा आम्ही चहासाठी थांबलो होतो. जर आम्ही 10-15 मिनिटे आधी निघालो असतो, तर कदाचित आम्ही पुरात अडकलो असतो आणि तेव्हा आमचे काय झाले असते, हे सांगता येत नाही." हा गट 21 ऑगस्ट रोजी रायपूरहून निघाला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 ऑगस्टला नेपाळला पोहोचला. त्यांनी एक कार भाड्याने घेतली होती आणि पशुपतिनाथ मंदिर, मनकामना मंदिर आणि इतर पर्यटन स्थळांना भेट देण्याचे नियोजन केले होते. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 ते 10:00 वाजताच्या दरम्यान धाडिंग जिल्ह्यातील 'मालेखु' (Malekhu) शहरातील एका हॉटेलमध्ये ते चहासाठी थांबले होते.

हेही वाचाः

मार्गदर्शीच्या व्यवस्थापकीय संचालिका शैलजा किरण यांना 'प्रोफेसर जे. फिलिप लीडरशिप अवॉर्ड' प्रदान!

Goa Casino Firing : गोव्यात 'मॅजेस्टिक प्राईड कॅसिनो'च्या संचालकांवर गोळीबार, खंडणीचा संशय?