ETV Bharat / bharat

वनविभागानं शेतकऱ्यांना दिली रानडुक्कर, नीलगायींना मारण्याची परवानगी

उत्तराखंडमध्ये पिकांचं नुकसान करणाऱ्या नीलगायी आणि रानडुक्कर मारण्याची परवानगी वनविभागानं दिली आहे. मात्र त्यासाठी विविध अटींचं पालन शेतकऱ्यांना करावं लागणार आहे.

GRANTED KILL WILD BOARS AND NILGAI
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 8, 2026 at 10:06 PM IST

|

Updated : January 8, 2026 at 10:54 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

देहरादून : उत्तराखंडमध्ये वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे वन विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रानडुक्कर आणि नीलगायी पिकांचं नुकसान करत असल्याच्या सततच्या तक्रारींदरम्यान, त्यांना मारण्याची सशर्त परवानगी देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ही परवानगी केवळ निकषांनुसारच दिली जाईल. त्यामुळे त्याचा गैरवापर होणार नाही.

Granted Kill Wild Boars And Nilgai
वनविभागाचं पत्र (ETV Bharat)

शेतकरी रानडुक्कर आणि नीलगायींच्या उपद्रवाने त्रस्त : राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी रानडुक्कर आणि नीलगायींच्या उपद्रवानं त्रस्त आहेत. हे प्राणी रात्रभर शेतात उभं असलेलं पीक नष्ट करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेती सोडून द्यावी लागली आहे. पिकांना नुकसान करणाऱ्या या वन्यजीवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत, अशी मागणी शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी सातत्यानं मागणी केली आहे.

Granted Kill Wild Boars And Nilgai
वनविभागाचं पत्र (ETV Bharat)

वन विभागाने जारी केला आदेश : शेतकऱ्यांच्या मागण्या आणि जमिनीवरील वास्तव लक्षात घेऊन, वन विभागानं हा आदेश जारी केला आहे. परवानगी मिळाल्यानंतरच पिकांचं नुकसान करणाऱ्या रानडुक्कर आणि नीलगायी मारल्या जाऊ शकतात. यासाठी प्रभावित शेतकऱ्यानं प्रथम विहित प्रक्रिया पूर्ण करावी, असं नमूद करण्यात आलं आहे.

कोणते अधिकारी देणार परवानगी : मुख्य वन्यजीव रक्षकांनी हे अधिकार अनेक विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रादेशिक वनसंरक्षक, विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वन परिक्षेत्र अधिकारी, उप वन परिक्षेत्र अधिकारी आणि वन निरीक्षक यांना अधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. हे अधिकारी स्थापित अटींवर आधारित परवानगी देऊ शकतात.

हेही वाचा :

  1. जंगल परिसरातील विहिरींना नाहीत कठडे; मेळघाटसह अनेक भागात वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका
  2. Video नीलगायीवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात वाघ, पहा व्हिडिओ
Last Updated : January 8, 2026 at 10:54 PM IST