ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशात बाल पोर्नोग्राफी प्रकरण; दोषी जेई आणि त्याच्या पत्नीला मृत्युदंडाची शिक्षा, सीबीआय पथकही उपस्थित

पोक्सो न्यायालयाने बाल पोर्नोग्राफी प्रकरणात आरोपी राम भवन आणि त्याची पत्नी दुर्गावतीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. दिल्लीत सीबीआयने 31 ऑक्टोबर 2020 रोजी एफआयआर नोंदवला होता.

Child pornography case
उत्तर प्रदेशात बाल पोर्नोग्राफी प्रकरण (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 21, 2026 at 2:19 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

बांदा: बांदा येथील विशेष पोक्सो न्यायालयाने चित्रकूटच्या सिंचन विभागाच्या निलंबित जेई आणि त्याच्या पत्नीला अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाच्या पोर्नोग्राफी प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावलीय. सुनावणीदरम्यान सीबीआय पथकही न्यायालयात उपस्थित होते. सरकारी वकील सौरभ कुमार सिंह यांनी सांगितले की, विशेष पोक्सो न्यायालयाने बाल पोर्नोग्राफी प्रकरणात आरोपी राम भवन आणि त्याची पत्नी दुर्गावती यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यांनी पुढे सांगितले की, दिल्लीत सीबीआयने 31 ऑक्टोबर 2020 रोजी एफआयआर नोंदवला होता.

सीबीआयच्या तपासात 200000हून अधिक व्हिडीओ : एक पुरुष आणि त्याची पत्नी राम भवन आणि दुर्गावती चित्रकूटमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होते. 3 ते 18 वयोगटातील अंदाजे 33 ते 34 मुलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडीओ 47 देशांमध्ये पाठवण्यात आले होते. 200000 हून अधिक व्हिडिओ होते. सीबीआयच्या तपासात 200000हून अधिक व्हिडीओ उघड झाले. त्यांनी सांगितले की, रामभवन हे कृत्य 10 वर्षांपासून सतत करीत होता. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली आणि संपूर्ण खटला चालवला. न्यायालयाने पती-पत्नीला पॉक्सो कायद्याअंतर्गत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. सीबीआयवर विशेष अभियोक्ता धारा सिंह यांनी खटला चालवला. त्यांनी सांगितले की, पीडित 34 मुलांना देण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रामभवनच्या घरातून 8 लाखांहून अधिक रुपये जप्त करण्यात आलेत आणि हे पैसे मुलांनाही दिले जातील.

सीबीआयला 2 लाख व्हिडीओ आणि फोटो सापडले: या प्रकरणाची चौकशी करताना सीबीआयला 47 देशांमधील विविध वेबसाइटवर 2 लाख व्हिडीओ आणि फोटो सापडले, जे आरोपी राम भवनने अपलोड केले होते. हे पुरावे म्हणून न्यायालयात सादर करण्यात आले. 34 अल्पवयीन मुलांचे जबाब देखील नोंदवण्यात आले. सीबीआयच्या तपासात असेही उघड झाले की, मूळचे बांदा येथील नारायणी भागातील रहिवासी असलेले आरोपी जोडप्यानं चित्रकूटमध्ये एक घर भाड्याने घेतले होते. ते डार्क वेबद्वारे अश्लील साइट्सवर अश्लील व्हिडीओ अपलोड करत होते.

सीबीआयने राम भवनला अटक केली: संपूर्ण प्रकरण 2020 चे आहे. सीबीआयने राम भवनला अटक केली. पुरावे गोळा करताना सीबीआयला राम भवनची पत्नी दुर्गावतीचाही सहभाग आढळला. त्यानंतर दुर्गावतीला अटक करण्यात आली आणि दोघांनाही बांदा तुरुंगात टाकण्यात आले. गेल्या पाच वर्षांत या प्रकरणाची अनेक वेळा सुनावणी झाली, आरोपींची चौकशी करण्यात आली आणि पुरावे गोळा करण्यात आले. दोषी ठरवल्यानंतर बांदा येथील विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी आरोपी जोडप्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

हेही वाचाः