ETV Bharat / bharat

भाजपा नेते संगीत सोम यांना बांगलादेशातून जीवे मारण्याची धमकी

बांगलादेशी नंबरवरून फोन आला आणि त्यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली.

Sangeet Som
संगीत सोम (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 5, 2026 at 4:14 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मेरठ : भाजपाचे नेते आणि माजी आमदार संगीत सोम यांनी अलीकडेच अभिनेता शाहरुख खानच्या आयपीएलमधील केकेआर संघात बांगलादेशी खेळाडूंचा समावेश करण्यास उघडपणे विरोध केला होता. यानंतर आता संगीत सोम यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. बांगलादेशी नंबरवरून फोन आला आणि त्यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी संगीत सोम यांनी सरधना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसंच, "अशा धमक्यांना मी घाबरणार नाही," असंही त्यांनी म्हटलं आहे.

आम्ही तुम्हाला उडवून देऊ : माजी आमदार संगीत सोम यांनी "ईटीव्ही भारत"ला सांगितलं की, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यांच्या नंबरवर त्यांना अनेकवेळा फोन आले. त्यांच्या पीएनं कॉल उचलला आणि कॉल करणारा बंगालीमध्ये बोलत होता. त्यांना वाटलं की, कॉल धमकीचा आहे. कॉल करणारा म्हणाला, "तुम्ही आणि इतर काही वृत्तवाहिन्या मुस्लिमांवर अत्याचार करत आहात आणि शाहरुख खानला लक्ष्य करत आहात. तुम्हाला काय वाटते? आम्ही बांगलादेशात आहोत. आम्ही तुमच्या देशातील प्रत्येक जिल्ह्यात आहोत. आम्ही तुम्हाला उडवून देऊ."

व्हॉट्सअ‍ॅपवरही धमकीचे मेसेज : माजी आमदार संगीत सोम यांनी सांगितलं की, "फोन करणारा खूप असभ्य होता. सुरक्षा अधिकाऱ्यानंही त्यांच्याशी बातचीत केली. तो खूप असभ्य वागला. त्यांचा फोन नंबरही मिळवण्यात आला आहे आणि ही धमकी बांगलादेशी नंबरवरून देण्यात आली होती. तसंच जीवे मारण्याची धमकी देणारे काही संदेशही व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर आले आहेत."

धमक्यांना घाबरत नाही : सरधना पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याचं संगीत सोम यांनी सांगितलं. तसंच त्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे पाठवलेल्या धमक्यांचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत, ज्यात अपशब्द वापरले आहेत. दरम्यान, ज्यावेळी फोन आला, त्यावेळी माजी आमदार संगीत सोम हे हल्द्वानीमध्ये होते. याशिवाय, "अशा धमक्यांना मी घाबरणार नाही," असंही त्यांनी म्हटलं आहे.

पोलिसांकडून चौकशी : संगीत सोम यांच्याकडून तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल केला जाईल आणि चौकशी केली जाईल, असं सरधना सीओ आशुतोष कुमार यांनी सांगितलं, तर ग्रामीण एसपी अभिजीत कुमार यांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी केली जात असून फोन नंबर ट्रेस केला जात आहे.

वाद काय होता? : सरधना विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले संगीत सोम यांनी आपल्या मतदारसंघातील एका जाहीर सभेत अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्सचा भागीदार शाहरुख खानवर शाब्दिक हल्ला चढवला होता. त्यांनी शाहरुख खानला देशाचा देशद्रोही देखील म्हटलं होतं. तसंच बांगलादेशात हिंदूंची हत्या होत आहे, तरीही शाहरुख खानच्या संघात एका बांगलादेशी खेळाडूचा समावेश करण्यात आल्याचं संगीत सोम यांनी म्हटलं होतं. दरम्यान, देशभरातील निषेधानंतर, बीसीसीआयनं बांगलादेशी खेळाडूला संघातून काढलं आहे.

हेही वाचा :

  1. सोमनाथ स्वाभिमान पर्व : 1000 वर्षांची अढळ श्रद्धा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विशेष लेख
  2. पंतप्रधान मोदी भला माणूस, पण रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवल्यास भारतावर आयात शुल्क वाढवणार, ट्रम्प यांचा भारताला इशारा
  3. उमर खालिदसह शरजील इमाम यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; पाच जणांना दिला जामीन