काँग्रेसनं निवडणुकीतील पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं; जाणून घ्या, प्रतिक्रिया
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना काँग्रेस नेत्यांनी अपयशाचं खापर ईव्हीएम मशिनसह निवडणूक आयोगावर खापर फोडलं आहे. जाणून घ्या, काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया

Published : November 14, 2025 at 4:14 PM IST
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीचे कल पाहता भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता येण्याची चिन्हे आहेत. महाआघाडीची निराशाजनक कामगिरी समोर येत असताना काँग्रेस नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते पवन खेरा म्हणाले, बिहारच्या जनतेपेक्षा जास्त ज्ञानेश कुमार गुप्ता (निवडणूक आयुक्त) प्रभावी ठरल्याचे दिसत आहे. काही तासामध्येच बिहारची जनता अधिक प्रभावी आहे की, ज्ञानेश कुमार गुप्ता हे अधिक प्रभावी आहे, हे समजणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेता दिग्विजय सिंह म्हणाले, मला वाटलेला संशय आता खरा ठरत आहे. एसआयआर फॉर्म न भरतादेखील ५ लाख मतदान वाढविण्यात आलं. गरीब, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक वर्गातील जनतेचं मतदान कमी करण्यात आलं आहे. ईव्हीएमवर अजूनही शंका आहे. काँग्रेसनं संघटनबांधणीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सध्या, निवडणुकीचं मतदान केंद्र हे सभा, मिरवणुकीसाठी नाही तर जनसंपर्क वाढविण्यासाठी आहे. विजयी उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा.
#WATCH | Thiruvananthapuram, Kerala: On #BiharElections, Congress MP Shashi Tharoor says, " ... it's very clear that the lead is overwhelmingly with the nda. it's obviously seriously disappointing, and if that turns out to be the final result, then i think there will have to be… pic.twitter.com/10rnFhMEs1
— ANI (@ANI) November 14, 2025
लोकशाही टिकण्याबाबत चिंता- मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जीतू पटवारी म्हणाले, जनतेचा जनादेश आणि एसआयआरचा परिणाम आहे. या देशात लोकशाही कशी टिकेल, अशी चर्चा सातत्यानं होत आहे. मतचोरी कशी थांबेल? धारणा निर्माण करणं आणि पुन्हा मतदानाची चोरी करणं हेच भाजपा, नरेंद्र मोदी आणि निवडणुकीनं तयार केलेलं चित्र आहे. त्यामुळे लोकशाही टिकण्याबाबत चिंता वाटत आहे. काँग्रेसचे नेता अशोक गेहलोत यांनी लोकशाही धोक्यात आल्याचा दावा केला. ते म्हणाले, हरियाणा, महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही तशीच स्थिती निर्माण केली आहे. एनडीएकडून करण्यात येणाऱ्या धनशक्तीच्या वापराबाबत लोक कल्पनादेखील करू शकत नाहीत. निवडणूक आयोग त्यांना मदत करत आहे. निवडणूक सुरू असताना १ कोटी ३५ लाख महिलांच्या खात्यावर प्रत्येकी १० हजार रुपये जमा झाले. निवडणूक आयोगाला काय झाले? राजस्थानमध्ये निवडणुकीची घोषणा होताच निवृत्तीवेतन मिळणं बंद झालं होतं.
हा एनडीएचा विजय नाही. तर एसआयआर आणि निवडणूक आयोगाचा विजय आहे. मते चोरीला गेली आहेत. बिहारमध्ये आम्ही शेवटपर्यंत आक्षेप नोंदवले, परंतु निवडणूक आयोगाने लेखी काहीही दिले नाही. अशा परिस्थितीत निकाल असेल येणे अपेक्षित होते- काँग्रेस नेते उदित राज
काय संघटनात्मक चुका होत्या- काँग्रेसचे खासदार शशी थरूर म्हणाले, एनडीएकडे प्रचंड आघाडी असल्याचं स्पष्ट आहे आहे. हे अंतिम निकाल ठरले तर खूप निराशाजनक आहे. मला वाटते की, खूप गंभीर आत्मपरीक्षण करावे लागेल. माझा अर्थ फक्त आत्मपरीक्षण करणे आहे. बसून विचार करणे, असा नाही. काय चूक झाली, किंवा काय संघटनात्मक चुका होत्या, याचा अभ्यास करणं असा आहे. मला बिहारमध्ये प्रचार करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे मी बिहारमध्ये प्रचार केलेला नाही. त्यामुळे मी तुम्हाला सखोल माहिती देऊ शकत नाही. पण, मी लोकांशी बोलत आहे. आपल्या पक्षाच्या नेत्यांनी कुठे चूक झाली, याचे खूप गंभीर विश्लेषण केलं पाहिजे.
भाजपा कार्यालयाबाहेर जल्लोषाचं वातावरण- बिहार विधानसभा निवडणुकीत ७० कोटींहून अधिक मतदारांनी सहभाग घेतला. विधानसभा निवडणुकीत ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. एनडीए पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता असल्यानं भाजपा आणि संयुक्त जनता दलाच्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. दिल्लीमधील भाजपाच्या कार्यालयाबाहेर आनंदाचं वातावरण आहे. कार्यकर्त्यांकडून लाडूंचे वाटप करण्यात येत आहे. ढोल-नगारे वाजवून कार्यकर्ते विजय मिळण्याच्या आशेनं जल्लोष साजरा करत आहेत. काही कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घातला. तर काही जणांना पंतप्रधानांचा फोटो असलेला केक कापून आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा-

