विमान वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अजितदादांना मोदी अन् शाहाच न्याय मिळवून देऊ शकतात- रोहित पवार
व्हीएसआर नावाच्या या कंपनीला खूप प्रभावशाली लोकांचा पाठिंबा असल्याचे दिसून येतंय. त्यापैकी बरेच जण सत्तेच्या पदांवर आहेत, असंही रोहित पवार म्हणालेत.

Published : February 21, 2026 at 11:56 AM IST
नवी दिल्ली- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला जवळपास एक महिना झालाय. तरीही त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अजित पवारांच्या कुटुंबातील त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाताबद्दल प्रश्न उपस्थित केलेत. रोहित पवारांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतलीय, त्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही प्रेझेंटेशनही सादर केलेत.
व्हीएसआर नावाच्या या कंपनीला खूप प्रभावशाली लोकांचा पाठिंबा : बारामती विमान अपघातावर पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) आमदार रोहित पवार म्हणतात, "या प्रकरणात आपण जितक्या खोलवर जाऊ तितक्या एक एक गोष्ट स्पष्ट होत आहेत. व्हीएसआर नावाच्या या कंपनीला खूप प्रभावशाली लोकांचा पाठिंबा असल्याचे दिसून येतंय. त्यापैकी बरेच जण सत्तेच्या पदांवर आहेत. व्हीएसआरशी संबंधित काही लोक काही राज्य सरकारांमध्ये सत्तेवर आहेत आणि काही राष्ट्रीय स्तरावर सत्ताधारी पक्षाशी जोडलेले आहेत. विशेष म्हणजे यात काही प्रमुख उद्योगपतीदेखील आहेत जे राजकीयदृष्ट्या अनेक नेत्यांशी जोडलेले आहेत, असंही रोहित पवार म्हणालेत.
VIDEO | Delhi: NCP (SP) MLA Rohit Pawar (@RRPSpeak) holds a press conference on Baramati air crash, says, " the deeper we go into this matter, the more one thing becomes clear: this company called vsr appears to have the support of very influential people. many of them are in… pic.twitter.com/v0XKvfq1YO
— Press Trust of India (@PTI_News) February 21, 2026
अजितदादांना मोदी अन् शाहाच न्याय मिळवून देऊ शकतात : जर आपण अजित पवारांच्या हत्येसंदर्भात कट रचल्याबद्दल बोलत असू, तर त्याचे दोन प्रकार असू शकतात. पहिलं तर राजकीय किंवा दुसरं व्यावसायिक कारण असू शकतं. या प्रकरणात दोघांपैकी कोणाचा नेमका सहभाग आहे हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच जर या तपासाला खरा न्याय मिळवून द्यायचा असेल, तर देशातील सर्वात शक्तिशाली नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच अजित (पवार) दादाला न्याय मिळवून देऊ शकतात. कारण यात सहभागी असलेले इतरही नेते शक्तिशाली आहेत, परंतु सध्या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती पंतप्रधान मोदी आणि अमित शाह आहेत," असंही रोहित पवार म्हणालेत.
विमान वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : तसेच आम्हाला विमान वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी इच्छा आहे. विमान उडण्यास अयोग्य असतानाही त्याचे उड्डाण करण्यात आले, त्यामुळे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, असंही रोहित पवारांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचाः
राहुल गांधी यांची केवळ काही मिनिटंच न्यायालयात हजेरी, भाजपानं दाखवले काळे झेंडे
शिर्डीत आंध्रप्रदेशातील पाकिटमारी टोळी अटकेत, सतर्क राहण्याचं प्रशासनाचं भाविकांना आवाहन

