आलू पुरी ते रसगुल्ला… मतमोजणी सुरू असताना दिल्लीतील भाजपा मुख्यालयात जोरदार तयारी
भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) गोटात जल्लोषाचं वातावरण असून नवी दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी पारंपरिक 'पुरी' आणि मिठाई बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

Published : May 4, 2026 at 1:33 PM IST
नवी दिल्ली : आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी येथील विधानसभा निवडणुकांसाठी सोमवारी (4 मे) सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) गोटात जल्लोषाचं वातावरण असून नवी दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी पारंपरिक 'पुरी' आणि मिठाई बनवण्याची तयारी सुरू केली आहे.
याचबरोबर, पाच राज्यांमधील सात विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील आज सुरू असून, भाजपानं दमदार कामगिरीचा विश्वास व्यक्त केला आहे. यासंदर्भात शेफनं न्यूज एज्नसी एएनआयशी बातचीत करत मोठ्या तयारीचा आढावा घेतला. "आम्ही पहाटे 4 वाजल्यापासूनच तयारी करत आहोत. सुमारे 400 ते 500 लोकांसाठी खास जेवण बनवले जात आहे. नाश्त्यामध्ये सँडविच, आलू-पुरी, पोहे आणि जिलेबी यांसारख्या विविध पदार्थांचा समावेश आहे. ताजी फळे, लस्सी, रबडी आणि पारंपरिक गोड पदार्थ दही हेदेखील तयार करण्यात आले आहे," असं शेफनं सांगितलं.
#WATCH | Delhi: Poori and sweets being prepared at the BJP Headquarters in Delhi as counting of votes for the elections to the Assemblies of Assam, Keralam, Tamil Nadu, West Bengal and Puducherry will begin shortly.
— ANI (@ANI) May 4, 2026
Counting of votes for by-polls in seven Assembly… pic.twitter.com/UKdgMXc1rW
पुढं शेफ म्हणाले की, "जेवणासोबत ताजी फळे, लस्सी, रबडी आणि पारंपरिक मिष्टी दही देखील तयार करण्यात आले आहे." दुपारच्या जेवणाच्या व्यवस्थेबद्दल शेफ यांनी सांगितलं की, "दुपारच्या जेवणात डाळ तडका, कढी पकोडा, परवळ आलू, भात आणि पापड आहेत." हा प्रसंग अधिक आनंददायी करण्यासाठी, मिष्टान्नाच्या मेन्यूमध्ये खास बंगाली रसगुल्ला आणि जिलेबीचा समावेश आहे, जे दिवसभरात 400 ते 500 लोकांना दिल्या जातील. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी 22 लोकांची टीम कार्यरत असल्याचे शेफने नमूद केलं.
दरम्यान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीची सुरुवात टपाल मतपत्रिकांनी झाली, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतमोजणी करण्यात आली. प्रत्येक फेरीचे निकाल ECINET प्लॅटफॉर्मवर आणि निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर रिअल-टाइममध्ये अद्ययावत केले जातील. या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
हेही वाचा :

