अरावली पर्वतांच्या वादग्रस्त व्याख्येवरील निकालाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती, आज सुनावणीत काय घडलं?
सर्वोच्च न्यायालयानं अरावली पर्वतरांगेच्या व्याख्येला मान्यता दिलेल्या निकालाला आज स्थगिती दिली आहे. जाणून घ्या, सविस्तर माहिती.


Published : December 29, 2025 at 1:54 PM IST
|Updated : December 29, 2025 at 2:14 PM IST
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी (२० नोव्हेंबर) आपला पूर्वीचा अरावलीबाबतचा निर्णय 'स्थगित' केला. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दिलेल्या अरावली टेकड्या आणि अरावली पर्वतरांगेच्या व्याख्येला स्थगिती मिळाली आहे.
सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी व ए. जी. मसिह यांच्या सुट्टीकालीन खंडपीठानं अरावलीच्या व्याख्येच्या संदर्भात स्वयंदखल घेत आज सुनावणी घेतली. सुनावणीत खंडपीठानं अरावलीबाबतच्या मुद्द्यांची छाननी करण्यासाठी एका नवीन तज्ञ समितीच्या स्थापनेचे आदेशही दिले आहेत. न्यायालयानं केंद्र सरकार आणि अरावली पर्वतरांगेतील चार राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि हरियाणा यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून उत्तर मागवलं आहे.
सरन्यायाधीश कांत म्हणाले की, संदिग्धता दूर करण्यासाठी स्वतंत्रपणे तज्ञांच्या मताची आवश्यकता आहे. नव्यानं सीमांकित केलेल्या अरवाली क्षेत्रात, नियमन केलेल्या देखरेखीनंतरही, खाणकाम किंवा नियंत्रित खाणकामामुळे कोणतेही प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम होतील का, या पैलूची तपासणी केली जाऊ शकते. नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानं व्याख्या स्वीकारल्यामुळे अरवाली प्रदेशाचा बहुतेक भाग खाणकाम उपक्रमांसाठी वापरला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे देशभरात पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले होते. अहवाल सादर होईपर्यंत दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमध्ये पसरलेल्या भागात नवीन खाण भाडेपट्टे देण्यास सर्वोच्च न्यायालयानं मनाई केली.
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं होतं की, यापूर्वी सरकार अरावली पर्वतांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. अरावली पर्वतांमध्ये खाणकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. काँग्रेस पक्षासह काही जण चुकीची माहिती पसरवत आहेत. अरावली पर्वतरांगा ही जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी असल्याचे मानले जाते. या पर्वतरांगा राजस्थानसाठी एक संरक्षक कवच प्रदान म्हणून कार्य करतात. त्यामुळे थार वाळवंटावर मर्यादा येतात. तसेच राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांचे दुष्काळापासून संरक्षण करते. अरावली पर्वतरांगात वनस्पती आणि औषधी वनस्पतीदेखील विपुल प्रमाणात आढळतात. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. आबिद अली खान यांनी सांगितलं की, एका बाजूला थार वाळवंट आहे. तर दुसरीकडे, अरावली पर्वतरांगा राजस्थानमधून जाते. त्यामुले थार वाळवंटाचा विस्तार होण्यापासून रोखले जाते.
हेही वाचा-

