ETV Bharat / bharat

खाद्यपदार्थ म्हणून 'धोतरा' विक्रीवर कारवाई; ॲमेझॉन, बिगबास्केट आणि स्विगी इन्स्टामार्टचे अन्न परवाने निलंबित

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मानवी वापरासाठी आणि खाद्यपदार्थ म्हणून विषारी 'धोतरा' (Datura) वनस्पतीची फळे आणि बियांची विक्री केल्याचे गंभीर आरोप आहेत.

Action taken against the sale of 'Dhotara' as a food item.
खाद्यपदार्थ म्हणून 'धोतरा' विक्रीवर कारवाई (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 25, 2026 at 1:24 PM IST

|

Updated : August 25, 2026 at 1:34 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बंगळुरू: एका महत्त्वपूर्ण कारवाईत कर्नाटक सरकारच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने ॲमेझॉन, बिगबास्केट आणि स्विगी इन्स्टामार्ट यांसारख्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केलेत. या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मानवी वापरासाठी आणि खाद्यपदार्थ म्हणून विषारी 'धोतरा' (Datura) वनस्पतीची फळे आणि बियांची विक्री केल्याचे गंभीर आरोप आहेत.

नियमांचे उल्लंघन आणि जनहिताला धोका : अन्न सुरक्षा आयुक्तांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, या कंपन्या FSSAI च्या परवाना आणि नोंदणी नियमांचे उल्लंघन करून 'धोतरा'ची खाद्यपदार्थ म्हणून विक्री आणि जाहिरात करत होत्या. इंग्रजीत 'थॉर्न ॲपल' (Thorn Apple) आणि तमिळमध्ये 'उमाथाई' (Umathai) म्हणून ओळखले जाणारे 'धोतरा' हे अत्यंत विषारी झाड आहे; त्याच्या बिया किंवा फळांचे सेवन मानवी आरोग्यासाठी जीवघेणे ठरू शकते. सार्वजनिक आरोग्य आणि अन्न सुरक्षेच्या हितासाठी सरकारने ही कठोर भूमिका घेतली आहे.

कठोर कायदेशीर कारवाई आणि निर्बंध : 'अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006' (Food Safety and Standards Act, 2006) अंतर्गत केंद्रीय आणि राज्य परवाना प्राधिकरणांना या कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित विक्रेत्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विक्रीवर पूर्ण बंदी : संबंधित सर्व कंपन्यांना 'धोतरा'ची विक्री, वितरण आणि विपणन तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जाहिराती हटवणे : प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या वेबसाइट्स आणि ॲप्सवरून 'धोतरा'शी संबंधित सर्व ऑनलाइन लिस्टिंग्ज, जाहिराती आणि प्रचारात्मक साहित्य तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

पुरवठादारांवर कारवाई : ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सना हे विषारी उत्पादन पुरवणाऱ्या तृतीय पक्ष विक्रेत्यांचे (third party vendors) परवाने देखील तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

पुढील कार्यवाही : भविष्यात अशा विषारी उत्पादनांची कोणत्याही स्वरूपात खाद्यपदार्थ म्हणून विक्री केली जाऊ नये, असे सरकारने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. संबंधित सर्व अधिकाऱ्यांना या प्रकरणाबाबतचा अनुपालन अहवाल (compliance report) लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि कंपन्यांना त्यांची बाजू मांडण्याची योग्य संधी दिल्यानंतरच या निलंबनाचा आढावा घेतला जाईल. तोपर्यंत या प्लॅटफॉर्म्सचे अन्न परवाने निलंबित राहतील.

हेही वाचाः

राम रहीमची 17 व्यांदा तुरुंगातून सुटका; 21 दिवसांच्या पॅरोलदरम्यान सिरसा येथील डेरा सच्चा सौदा आश्रमात राहणार

अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीत तीन बालकांचा मृत्यू, आतापर्यंत कुठे कुठे घडल्या आगीच्या घटना; जाणून घ्या घटनाक्रम

Last Updated : August 25, 2026 at 1:34 PM IST