ETV Bharat / bharat

नोएडामध्ये इमारतीच्या 21 व्या मजल्यावर एसीच्या स्फोटामुळं लागली आग, कुटुंबाची सुखरूप सुटका

एसीच्या स्फोटामुळं ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाची काही गाड्या आणि स्थानिक पोलिसांचे एक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

AC Blast Sparks Fire On 21st Floor Of Noida High-Rise; Family Rescued, No Casualties
नोएडामध्ये इमारतीच्या 21 व्या मजल्यावर एसीच्या स्फोटामुळं लागली आग (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 29, 2026 at 2:36 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली/नोएडा : उत्तर प्रदेशातील नोएडाच्या सेक्टर 119 मधील अरण्य सोसायटीमधील एका अपार्टमेंटला आग लागली. ही आगीची घटना अपार्टमेंटच्या 21 व्या मजल्यावर घडली. आगीच्या ज्वाला आणि धुरामुळे सोसायटीमध्ये घबराट पसरली. रहिवाशांनी तत्काळ अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, एसीच्या स्फोटामुळं ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाची काही गाड्या आणि स्थानिक पोलिसांचे एक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचं काम सुरु केलं. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून, सुरक्षा कर्मचारी आणि प्रशासनानं जवळच्या अपार्टमेंटमधील लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेलं.

एसीच्या स्फोटामुळं फ्लॅटमध्ये आग लागली. 20 ते 25 अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यथ आले. फ्लॅटमध्ये झोपलेल्या कुटुंबाला वेळेवर बाहेर काढण्यात आलं. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग इतर फ्लॅट्समध्ये पसरण्यापासून रोखली आणि त्यांना कोणताही धोका पोहोचू दिला नाही. सुदैवानं, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नोएडामध्ये इमारतीच्या 21 व्या मजल्यावर एसीच्या स्फोटामुळं लागली आग, कुटुंबाची सुखरूप सुटका (ETV Bharat)

मुख्य अग्निशमन अधिकारी प्रदीप कुमार चौबे यांनी सांगितलं की, सोमवारी सेक्टर 113 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर 119 मधील अरण्य सोसायटीच्या 21 व्या मजल्यावरील एका फ्लॅटला आग लागल्याची माहिती मिळाली. गौतम बुद्ध नगर आणि स्थानिक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. सध्या तरी कोणीही अडकलेलं नाही आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून योग्य ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच त्यांनी प्रशासनाला सर्व स्तरांवर सतर्कता बाळगण्याचे निर्देशही दिले आहेत.

हेही वाचा :

  1. मुंबई गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीने डेहराडूनमधील व्यावसायिकाचे केले अपहरण आणि 25 लाखांची केली मागणी
  2. हरिद्वारमध्ये भीषण रस्ते अपघात! रोडवेज बस आणि पिकअप ट्रकची धडक; 3 जण ठार, 4 जखमी
  3. आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, रेल्वे पूल कोसळला; अमित शाहांनी घेतला परिस्थितीचा आढावा

Conclusion: