ETV Bharat / bharat

अहमदाबादमध्ये 'इबोला'बाबत अलर्ट! 11 प्रवासी होम क्वारंटाईन, आफ्रिकेमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष

गुजरात राज्यातील अहमदाबाद महानगरपालिकेच्या (एएमसी) आरोग्य विभागानं इबोला विषाणूचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी व्यापक तयारी केली आहे.

Ebola Alert in Ahmedabad, 11 Passengers Under Home Quarantine
अहमदाबादमध्ये 'इबोला'बाबत अलर्ट! 11 प्रवासी होम क्वारंटाईन (File Photo - IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2026 at 6:46 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अहमदाबाद : कोरोना महामारीनंतर आता जगावर 'इबोला' विषाणूचं नवं संकट घोंगावत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो (DRC) आणि युगांडा इथं इबोलाचा प्रसार होत असल्याबाबत एक सावधगिरीचा इशारा जारी केला आहे. तसंच आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, केंद्र सरकारनं देखील भारतात हाय-अलर्ट जारी केला असून आंतरराष्ट्रीय विमानतळं आणि बंदरांवर कडक स्क्रिनिंग सुरू केलं आहे. अशात गुजरात राज्यातील अहमदाबाद महानगरपालिकेच्या (एएमसी) आरोग्य विभागानं इबोला विषाणूचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी व्यापक तयारी केली आहे.

क्वारंटाईन कक्ष तयार : आफ्रिकेतील इबोला प्रभावित देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष दिले जात असून, विमानतळावर तपासणी सुरू करण्यात आली आहे. अहमदाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं इबोलाचा सामना करण्यासाठी क्वारंटाईन कक्ष तयार केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून, गेल्या तीन दिवसांत आफ्रिकेतून अहमदाबादमध्ये आलेल्या 11 प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. यामध्ये नऊ भारतीय आणि दोन युगांडाच्या नागरिकांचा समावेश आहे.

विमानतळावर कडक स्क्रिनिंग : अहमदाबाद विमानतळावर आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. इबोलाची लक्षणं आढळणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला तत्काळ आयसोलेशन करण्यात येणार आहे. युगांडा आणि काँगोसह इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी अनिवार्य क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे.

रुग्णालयांमधील तयारी

  • एसव्हीपी रुग्णालय : 60 खाटांचा आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना इथं ठेवण्यात येईल.
  • सिव्हिल रुग्णालय : याठिकाणी देखील 60 खाटांचा आयसोलेशन वार्ड तयार आहे.
  • खबरदारीचा उपाय अधिक वाढवण्यासाठी, एसव्हीपी रुग्णालयात अतिरिक्त 30 खाटांचा एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.

आरोग्य विभागाकडून जनतेला आवाहन : आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लक्षणं दिसणाऱ्या प्रत्येकाला होम क्वारंटाईन करण्यात येईल. तसंच रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना तात्काळ रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये पाठवलं जाईल. दरम्यान, अहमदाबाद आरोग्य विभागानं नागरिकांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. जगभरात इबोलाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री लक्षात घेऊन ही तयारी करण्यात आली आहे. तसंच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

बंगळुरूमध्ये एका महिलेमध्ये विषाणूची लक्षणे

युगांडाहून आलेल्या एका महिलेला कर्नाटकची राजधानी बंगळूरू येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिलेमध्ये इबोला विषाणूची लक्षणे आढळून आली आहेत, मात्र, भारतात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. बंगळूर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विषाणूची लक्षणे दिसू लागल्यानंतर युगांडा येथून आलेल्या 28 वर्षीय महिलेला मंगळवारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इबोला-ग्रस्त भागातून आलेल्या या महिलेला अंगदुखीसारखी सौम्य लक्षणं जाणवू लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तिच्या हॉटेलमधून रुग्णालयात आणण्यात आले. त्यांनी सांगितलं की, तिचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठवण्यात आले असून, रिपोर्टची प्रतीक्षा आहे. नियमानुसार, तिची पुन्हा चाचणीही केली जाईल. तसंच महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे.

हेही वाचा :

  1. कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप : काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री बदलाचे संकेत; सिद्धरामय्या राजीनामा देण्याची शक्यता
  2. द लास्ट प्लेग्राऊंड 3 : बिहारमधील उद्यानांची दुरावस्था; तुटलेले झोके, कललेले खांब आणि आकुंचन पावणाऱ्या खेळाच्या जागा!
  3. ओडिशामध्ये शौचालयाच्या टाकीत गुदमरून सहा जणांचा मृत्यू